Advertisement

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या केंद्राचा मुंबईत विस्तार - मुख्यमंत्री


वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या केंद्राचा मुंबईत विस्तार - मुख्यमंत्री
SHARES

जगातील चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी स्थापन केलेल्या केंद्राचा मुंबईत विस्तार करण्याचा निर्णय वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम-२०१८ मध्ये उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस तीन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.


मुंबईतील केंद्रातून ज्ञानाचे आदानप्रदान

दौऱ्याच्या पहिल्या दिवशी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अन्नसुरक्षा विषयक विभागाचे प्रमुख सीन डी क्लिन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राज्यातील शेतकऱ्यांसाठी व्हॅल्यूचेन, शेतीसाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर, नवीन संशोधनांचा उपयोग आणि सकस अन्नाची गरज अशा अनेक विषयांवर यावेळी व्यापक चर्चा झाली. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या निर्णयाचे स्वागत करून मुख्यमंत्री म्हणाले, विविध तज्ज्ञांचा सहभाग असलेल्या फोरमच्या मुंबईतील केंद्रातून ज्ञानाचे आदानप्रदान करण्याबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारित धोरणांची अंमलबजावणी करणे अधिक सुकर होईल. या केंद्राच्या माध्यमातून रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, शेतीसाठी ड्रोनसारख्या तंत्राच्या वापरावर भर देण्यात येणार आहे.


रिलायन्सची मॅग्नेटिक महाराष्ट्र सेंटरला भेट

दरम्यान, रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दावोस येथील मॅग्नेटिक महाराष्ट्र सेंटरला भेट दिली. गावांना डिजिटली कनेक्ट करण्याची व्यापक योजना आणि इंडस्ट्री ४.० अर्थात चौथ्या औद्योगिक क्रांतीसंदर्भातील अनेक मुद्द्यांसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी त्यांनी यावेळी चर्चा केली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा