Advertisement

को ऑपरेटिव्ह बँक युनियन कर्मचारी करणार आंदोलन


को ऑपरेटिव्ह बँक युनियन कर्मचारी करणार आंदोलन
SHARES

नरिमन पॉईंट - 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द केल्यावर रिझर्व्ह बँकेने सर्व करन्सी चेस्टना आवश्यकतेपेक्षा नव्या स्वरूपातील रक्कम पुरवण्याचे आदेश सर्व खासगी आणि सरकारी बँकांना दिले असतानाही, केंद्र शासन रिझर्व्ह बँक आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी नागरी सहकारी बँकांना मोडीत काढण्याच्या दृष्टीने असहकार्य सुरु केले. या विरोधात को ऑपरेटिव्ह बँक युनियन कर्मचारी आंदोलनाचा बडगा उचलण्याच्या तयारीत आहेत.
बँक नियमावलीनुसार इतर सर्व बँकांबरोबरच नागरी सहकारी बँकांचे देखील नियमन केले आहे, मात्र रिझर्व्ह बँक या सुविधा पुरवण्याबाबत दुजाभाव करत असल्याचा आरोप युनियनने केला आहे. नागरी सहकारी बँकांचे खाते असलेल्या राष्ट्रीयकृत आणि खासगी बँका नागरी सहकारी बँकांच्या रक्कम स्वीकारत नसल्यामुळे बँकांच्या सर्व तिजोरीत नोटांचा खच पडला आहे. त्यामुळे ग्राहक सेवेवर होणारा परिणाम पाहता युनियनचे अध्यक्ष खासदार आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली रिझर्व्ह बँकेच्या विरोधात आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याचे कार्याध्यक्ष सुनील साळवी यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा