Advertisement

खूशखबर, ईपीएफओ देणार ७ लाख रुपयांचं कोरोना विमा संरक्षण

देशात कोरोनाच्या संकटामुळे सर्वच जण धास्तीमध्ये आहेत. या कोरोना संकट काळात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे.

खूशखबर, ईपीएफओ देणार ७ लाख रुपयांचं कोरोना विमा संरक्षण
SHARES

देशात कोरोनाच्या संकटामुळे सर्वच जण धास्तीमध्ये आहेत. या संकट काळात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे. ईपीएफओने आपल्या सदस्यांना ७ लाख रुपयांपर्यंत कोरोना जीवन विमा सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. 

ईपीएफओने ईडीएलआय म्हणजेच एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीमअंतर्गत विमा कवच वाढवून ७ लाख रुपये केले आहे. विशेष म्हणजे हे विमा कवच त्या कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे, ज्यांनी वर्षभरात एकाहून अधिक कंपन्यांमध्ये काम केलं आहे. विम्याचा दावा कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांचे आजारपण, दुर्घटना आणि नैसर्गिक मृत्यूवरही केला जाऊ शकतो. आतापर्यंत या विम्याची रक्कम अडीच लाख रुपयांपर्यंत होती. या योजनेखाली वारसदार व्यक्ती कर्मचाऱ्याचे आजारपण, दुर्घटना, अपघाती आणि नैसर्गिक मृत्यूच्या वेळी दावा करू शकते.

कोरोना संकटात ईपीएफओने आपल्या सदस्यांना दिलासा देण्यासाठी ही योजना आणली आहे. कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी आणि डीएची १२ टक्के रक्कम  भविष्य निर्वाह निधी मध्ये जाते. त्याचबरोबर १२ टक्के योगदान कंपनीकडून दिले जाते. कंपनीच्या १२ टक्के योगदानापैकी ८.३३ टक्के रक्कम एम्प्लॉई पेन्शन स्कीम अर्थात ईपीएसमध्ये जमा होते. अशा प्रकारे ईडीएलआय योजनेत केवळ कंपनीकडून प्रिमियम जमा होतो.

ईडीएलआय स्कीममध्ये दाव्याची गणना कर्मचाऱ्याला मिळालेल्या मागील १२ महिन्यांतील बेसिक सॅलरी आणि डीएच्या आधारे केली जाते. या विम्याचे क्लेम कव्हर शेवटची बेसिक सॅलरी आणि डीएच्या ३५ पट असते. जर तुम्हाला शेवटच्या १२ महिन्यांत बेसिक सॅलरी आणि डीए १५  हजार रुपये आहे, तर इन्शुरन्स क्लेम ३५ पट म्हणजेच ७ लाख रुपये असेल.

ईपीएफ सदस्याचा अकाली मृत्यू झाला तर त्या सदस्याची वारसदार व्यक्ती विम्यासाठी दावा करू शकेल. क्लेम करणारी व्यक्ती १८ वर्षांपेक्षा कमी वयाची असेल तर त्याच्या वतीने त्याचा पालक क्लेम करू शकतो. यासाठी इन्शुरन्स कंपनीला कर्मचाऱ्याच्या मृत्यूचे प्रमाणपत्र, सक्सेशन सर्टिफिकेट, अल्पवयीन वारसदारच्या वतीने अर्ज करणाऱ्या पालकाचे प्रमाणपत्र आणि बँक तपशील द्यावा लागेल. 



हेही वाचा -

पीएफमधील ५ लाखांवरील गुंतवणुकीच्या व्याजावर लागणार कर

आयकर विभाग जूनमध्ये लाँच करणार नवे ई-फाइलिंग पोर्टल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा