Advertisement

मे महिन्यात १३ दिवस बँकांना सुट्टी, जाणून घ्या तारखा

जाणून घ्या मे महिन्यात बँकांना कधी सुट्टी आहे ते...

मे महिन्यात १३ दिवस बँकांना सुट्टी, जाणून घ्या तारखा
SHARES

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन सुरू आहे. तरी या काळात बँकसेवा सुरू आहे. पण पुढील महिन्यात म्हणजेच मे महिन्यात १३ दिवस बँका बंद असणार आहेत. एका बाजूला लॉकडाऊन सारखी परिस्थिती आणि त्यात बँकांना असलेल्या सुट्ट्या यामुळे काही लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

पुढील महिन्यात असणाऱ्या सुट्ट्यांचा विचार करता तुम्ही बँकेशी संबंधित काही अतिशय महत्त्वाची कामे आताच करून घ्या. नाहीतर मे महिन्यात अडचणींना तोंड द्यावे लागले. अर्थात लॉकडाऊनमुळे सर्व बँकांनी ऑनलाईन सेवा देत आहेत. पण बँकेत प्रत्यक्षात जाऊन करण्यासारखे अत्यंत महत्त्वाचे काम असेल तर ते करून घेणे हिताचे ठरले. 

जाणून घेऊयात मे महिन्यात बँकांना कधी सुट्टी आहे ते...

  • ०१ मे - कामगार दिन
  • ०३ मे - रविवार
  • ०७ मे- बुद्ध पौर्णिमा (जवळपास सर्व राज्यात सुट्टी)
  • ०८ मे- रविंद्रनाथ टागोर जयंती (पश्चिम बंगाल)
  • ०९ मे- दुसरा शनिवार
  • १० मे- रविवार
  • १७ मे- रविवार
  • २१ मे- शब-ए-कादर (जम्मू-काश्मीर)
  • २२ मे- जुम्म-उल-विदा (जम्मू-काश्मीर)
  • २४ मे- रविवार
  • २५ मे- इद-उल-फित्र
  • ३१ मे- रविवार

कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन काळात देखील बँकेत कर्मचारी काम करत आहेत. काही बँकांनी कामकाजाच्या तासात बदल केलेत. आरोग्य सुरक्षेचा विचार करून काही बँका दुपारी एक वाजेपर्यंतच खुल्या ठेवल्या जात आहेत.




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा