Advertisement

कोरोना व्हायरसमुळे राजमाच्या किंमतीत वाढ, आयात-निर्यातीवरही परिणाम

एका आकडेवारीनुसार, राजमाचे जवळपास ८ कंटेनर दररोज भारतात विकले जातात. त्यापैकी ६ कंटेनर चीनमधून येतात. पण राजमा आयात न झाल्यानं 'इतक्या' किंमतीनं महागला राजमा...

कोरोना व्हायरसमुळे राजमाच्या किंमतीत वाढ, आयात-निर्यातीवरही परिणाम
SHARES

जगातील देशांमध्ये कोरोना व्हायरसबद्दल चिंता आहे. चीनमध्ये या विषाणूमुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे मृतांचा आकडा १ हजारांच्या पुढे गेला आहे. जगातील अनेक देशांमध्ये या विषाणूचा संसर्ग पसरत आहे. चिंता फक्त आजारपणामुळे होत नाही. कोरोना विषाणूचा अनेक प्रकारे परिणाम झाला आहे. चीनमधील व्यवसायावरही याचा परिणाम झाला आहे.

जगातील अनेक देश चीनबरोबर व्यवसाय करतात. भारतही त्यापैकीच एक आहे. चीनमधून बऱ्याच वस्तू भारतात आयात केल्या जातात. त्या व्यवसायावर कोरोना व्हायरसमुळे परिणाम होत आहे. आयात आणि निर्यातीवर होणाऱ्या परिणामांमुळे वस्तूंच्या किंमतीवर याचा परिणाम झाला आहे

राजमा महागला

चीनमध्ये कोरोना विषाणू पसरल्यामुळे गेल्या १० दिवसांत राजमाच्या किंमतीत वाढ झाली आहे. जवळपास ८ टक्क्यांनी ही वाढ झाल्याचं समोर आलं आहे. अद्याप त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. परंतु कोरोना विषाणूमुळे आणि चीनमधील लॉक-डाऊन परिस्थिती लांबणीवर पडली तर याचा अधिक परिणाम आयातीवर होईल. आयातीवर परिणाम झाला की अर्थात तिथून आयात होणाऱ्या वस्तूंच्या किंमतीत वाढ होईल

भारत गरजेनुसार ५० टक्के राजमा चीनकडून आयात करतो. चीनमधून आयात होणाऱ्या मुख्य पदार्थांमध्ये राजम्याचा समावेश आहे. गेल्या दहा दिवसांत जागतिक बाजारात राजमाचे दर प्रति टन १ हजार १०० डॉलरवर पोहोचले आहेत. ही सुमारे 8 टक्के वाढ आहे.

चीनमध्ये कंटेनर अडकून

चीनमधील डालियान बंदरात आयात-निर्यात करण्याचे काम पूर्णपणे थांबले आहे. शटडाऊनमुळे डालियान बंदर इथं भारतात येणारे राजमाचे ३०० कंटेनर ठेवले आहेत. परंतु सध्या ते आयात करणं शक्य नाही. या कंटेनरमध्ये सुमारे २४ टन राजमा आहेत. तज्ज्ञ सांगत आहेत की, या मालवाहतुकीला अद्याप भारतात पोहोचण्यास सुमारे एक महिना लागणार आहे. तोपर्यंत राजमाचे दर अधिक महाग होतील.

आयात न झाल्यानं नुकसान

शटडाऊनमुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी अजून झाली नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. काही आठवड्यांनंतर नुकसानीची आकडेवारी समोर येईल. चीनच्या बंदरात फेब्रुवारी-मार्चचे जहाज अडकलं आहे. कोरोना विषाणूमुळे या मालवाहतुकीचे आगमन उशिरा झाले तर नुकसान अधिकच होईल.

राजमासाठी चीनवर अवलंबून

एका आकडेवारीनुसार, राजमाचे जवळपास ८ कंटेनर दररोज भारतात विकले जातात. त्यापैकी ६ कंटेनर चीनमधून येतात. त्यावरून आपण राजमाच्या आयातीवर चीनवर किती अवलंबून आहोत याचा अंदाज येऊ शकतो. तज्ञांच्या नुसार, सध्या राजमाच्या घाऊक आणि किरकोळ बाजारात किंमती स्थिर आहेत. राजमा मुंबईच्या घाऊक बाजारात सुमारे ८० ते ८१ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. दिल्लीच्या घाऊक बाजारात त्याचे दर प्रति किलो ८३ ते ८४ रुपये आहेत. चीनमधून राजमा आयात करण्यात अशीच अडचण राहिली तर राजमाच्या किंमती वाढू शकतात.

चीनच्या निर्यातीवरही परिणाम

चीनमधून जश्या अनेक वस्तू भारतात येतात तश्याच भारत अनेक वस्तू चीनमध्ये निर्यात करतो. यात कापूस आणि धाग्यापासून बनवण्यात येणाऱ्या वस्तूंचा समावेश आहे. चीनबरोबर निर्यातही ठप्प झाली आहे. यामुळे गेल्या दहा दिवसांत कापूस आणि धाग्याच्या किंमती ४ टक्क्यांनी खाली आल्या आहेत.

कापूस आणि धाग्याच्या एकूण निर्यातींपैकी २५ टक्के भारत चीनला निर्यात करतो. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे चीनला निर्यात होणारा माल भारताच्या बंदरांवर अडकला आहे. सूती धाग्याचे दर ३ ते ४ टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. तसंच कापसाचे दर जवळपास ४ टक्क्यांनी कमी केले आहेत.


हेही वाचा

कोरोना व्हायरसचा फटका पाम तेलाला, आवक थांबली

सरकारी बँकांचा पुन्हा संप, 'या' ५ दिवशी कामकाज असेल ठप्प

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा