Advertisement

मागणी वाढण्याच्या चर्चेमुळे कच्च्या तेलाच्या दरात सुधारणा

जागतिक तेलाची मागणी वाढण्याच्या चर्चेमुळे मागील आठवड्यात मोठा तोटा सहन केलेल्या तेलाच्या दरात सुधारणा होण्यास मदत झाली.

मागणी वाढण्याच्या चर्चेमुळे कच्च्या तेलाच्या दरात सुधारणा
SHARES

जागतिक गुंतवणूकदारांमध्ये जोखिमीची भूक पुन्हा दिसून आल्याने तसंच जागतिक तेलाची मागणी वाढण्याच्या चर्चेमुळे मागील आठवड्यात मोठा तोटा सहन केलेल्या तेलाच्या दरात सुधारणा होण्यास मदत झाली असल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितलं. 

बुधवारी, अमेरिकन क्रूडसाठ्यात वाढ होऊनही डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ४.२ टक्क्यांनी वाढले आणि ७०.३ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. आठवड्याच्या सुरुवातीला मोठी घसरण झाल्याने क्रूडचे दर वाढले.

एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या रिपोर्टनुसार, १६ जुलै २०२१ रोजी संपलेल्या आठवड्यात अमेरिकेच्या क्रूड साठ्यात २.१ दशलक्ष बॅरलची वाढ झाली. सलग ८ आठवडे साठा कमी होत गेल्याने मागील आठवड्यात अमेरिकी क्रूड साठ्याने मर्यादा गाठली. त्यामुळे क्रूडमधील नफा मर्यादित राहिला. ओपेक + आणि सदस्यांनी ऑगस्ट २०२१ ते डिसेंबर २०२१ पर्यंत क्रूड तेलाचा पुरवठा दररोज ४००,००० बॅरलनी वाढवण्यावर सहमती दर्शवली. त्यानंतर तेलाचे दर आठवड्याच्या सुरुवातीलाच ७ टक्क्यांनी वाढले.

सोने: कालच्या व्यापारी सत्रात, स्पॉट गोल्डचे दर ०.४ टक्क्यांनी घसरले व १८०३ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. जागतिक गुंतवणूकदारांमध्ये जोखिमीची भूक वाढल्याने स्पॉट गोल्डचे दर मागील आठवड्यात निचांकी स्थानावरच खिळून राहिले. त्यामुळे सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याचे आकर्षण कमी झाले. डेल्टा व्हेरिएंट कोव्हिड-१९ संक्रमितांमध्ये वाढ झाल्याने जागतिक गुंतवणूकदार सावध झाले आहेत. अनेक देशांत लॉकडाऊन वाढण्याची चर्चा आहे. त्यामुळे आर्थिक सुधारणा लांबवणीवर पडेल, या विचाराने बाजार भावनांवर परिणाम झाला. दरम्यान, मागील आठवड्यात विक्री अनुभवल्यानंतर कालच्या सत्रात जागतिक इक्विटी बाजार आणि बाँड रिटर्नमध्ये सुधारणा दिसून आली. त्यामुळेही गुंतवणूकदार सोन्यापासून दूर राहिले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा