Advertisement

PMC बँकेविरोधात पोलिसांत तक्रार

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (PMC) बँकेच्या ठेवीदारांनी गुरूवारी बँकेच्या व्यवस्थापकाविरोधात सायन पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

PMC बँकेविरोधात पोलिसांत तक्रार
SHARES

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (PMC) बँकेच्या ठेवीदारांनी गुरूवारी बँकेच्या व्यवस्थापकाविरोधात सायन पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सोबतच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही पीएमसी बँकेविरोधात कडक कारवाई करण्याची विनंती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ला केली आहे.

मर्यादा वाढवली

आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता असल्याने आरबीआय (RBI) ने PMC बँकेवर ६ महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. यामुळे बँकेला पुढील ६ महिन्यांमध्ये कुठलंही नवीन कर्ज देणं, नवीन ठेवी स्वीकारण्याला मनाई केली आहे. तसंच बँकेच्या खातेधारकांना देखील कुठल्याही खात्यातून १ रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्यावर बंधन टाकलं होतं. परंतु आरबीआयने ही मर्यादा वाढवून १० हजार रुपये केली आहे. यामुळे चिंताग्रस्त झालेल्या पीएमसी बँक ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. 

पोलिसांत तक्रार

दरम्यान पीएमसी बँकेच्या अनेक खातेधारांनी गुरूवारी सायन पोलिसांत सामुहीक तक्रार दाखल केली. बँकेचे अध्यक्ष आणि संचालकांसहीत १४ जणांविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपींनी जनतेचा पैसा लुटल्याचं या तक्रारीत नमूद करण्यात आहे. तसंच ज्या लोकांची नावे तक्रारीत आहेत, त्यांचे पासपोर्ट जप्त करण्याची मागणीही यात करण्यात आली आहे.

आरबीआयला पत्र 

यासोबतच किरीट सोमय्या यांनी देखील मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखा (EOW) यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. पीएमसी बँकेतील ९.१२ लाख ठेवीदारांचा पैसा बँकेतील टॉप मॅनेजमेंटमधील अधिकाऱ्यांनी आणि इस्टेट फर्म एचडीआयएल यांनी लूटल्याचं सोमय्या यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. सोमय्या यांनी आरबीआयला पत्र पाठवून एचडीआयएल कंपनी आणि पीएमसी बँक यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कर्मचाऱ्यांचं आंदोलन

पीएमसी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी एचडीआयएल ग्रुप मालकाच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. आरबीआयने बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले असून बँकेचे कामकाज पाहण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती केली आहे.

निलंबित करण्यात आलेले पीएमसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक थॉमस वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, बँकेजवळ पुरेशी रोकड उपलब्ध असून खातेधारांचे पैसेही सुरक्षित आहेत. बँकेची सर्व कर्जेसुद्धा सुरक्षित आहेत. केवळ एचडीआयएल या एकाच मोठ्या कर्जे खात्यामुळे हे संकट ओढवलं आहे. 



हेही वाचा-

PMC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, आरबीआयने वाढवली पैसे काढण्याची मर्यादा

'ह्या' कारणामुळे पीएमसीवर आले निर्बंध



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा