Advertisement

वाहन, आरोग्य विम्याचा प्रिमियम भरण्यासाठी आणखी मुदतवाढ

लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आल्यानंतर आता थर्ड पार्टी मोटार विमा आणि आरोग्य विम्याच्या प्रिमियम भरण्याच्या मुदतीतही वाढ करण्यात आली आहे.

वाहन, आरोग्य विम्याचा प्रिमियम भरण्यासाठी आणखी मुदतवाढ
SHARES

लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आल्यानंतर आता थर्ड पार्टी मोटार विमा आणि आरोग्य विम्याच्या प्रिमियम भरण्याच्या मुदतीतही वाढ करण्यात आली आहे. दोन्ही विम्याच्या प्रिमियम भरण्याची मुदत १५ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून ही माहिती दिली. त्यामुळे सध्या प्रिमियम न भरल्यामुळे विमा पॉलिसी रद्द होणार नाही.

ज्या ग्राहकांचे मोटार आणि आरोग्य विम्याचे प्रिमियम भरणे २५ मार्च ते ३ मे या कालावधीत देय होते आता त्यांना वाढीव मुदत मिळणार आहे. १५ मेपर्यंत त्यांनी या दोन्ही विम्याचा हफ्ता भरला तर त्यांच्या पॉलिसी कायम राहू शकतात. त्या रद्द होणार नाहीत. आधी ज्या विम्याचे प्रिमियम २५ मार्च ते १४ एप्रिल या काळात देय होते. त्यामध्ये २१ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली होती. 

लॉकडाऊनचा विचार करून सामान्य ग्राहकांचे हित जपण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे, असं अर्थ मंत्रालयाने म्हटलं आहे. या ग्राहकांना १५ मेच्या आत आपला विमा नूतनीकरण करावे लागेल. सरकारने देशातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 



हेही वाचा -

मुंबईत कोरोनाचे २०१० रुग्ण

लक्षणे असलेल्यांचीच होणार चाचणी, मुंबई महापालिकेचा निर्णय




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा