Advertisement

पोस्ट ऑफिस आरडी खात्यात आता ऑनलाईन जमा करा पैसे

आपलं रिकरिंग डिपॉझिट (आरडी) खातं पोस्ट ऑफिसमध्ये असेल तर आपल्याला त्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी आता पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही.

पोस्ट ऑफिस आरडी खात्यात आता ऑनलाईन जमा करा पैसे
SHARES

आपलं रिकरिंग डिपॉझिट (आरडी) खातं पोस्ट ऑफिसमध्ये असेल तर आपल्याला त्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी  आता पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) द्वारे आपण पोस्ट ऑफिसच्या आरडी खात्यात पैसे जमा करू शकता. आपला मासिक हप्ता या अॅपद्वारे आपल्या आरडी खात्यात ऑनलाइन हस्तांतरित केला जाऊ शकतो.

असे करा पैसे डिपाॅझिट

- आपल्या बँक खात्यातून आयपीपीबी खात्यात पैसे ट्रान्सफर करा

- आयपीपीबी अ‍ॅपमध्ये डीओपी (DOP) वर जा. येथे रिकरिंग डिपॉझिट (RD) निवडा

- रिकरिंग डिपॉझिटमध्ये आरडी खाते क्रमांक आणि डीओपी ग्राहक आयडी टाइप करा

- इन्स्टाॅलमेंटचा कालावधी आणि रक्कम भरा

- इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आपल्याला आयपीपीबी अ‍ॅपद्वारे केलेल्या पेमेंट ट्रान्सफरबद्दल माहिती देईल.

- पोस्टाच्या इतर योजनांमध्ये आयपीपीबी बचत खात्याद्वारे आपण नियमित पेमेंट देखील करू शकता.

आरडी म्हणजे काय?

आवर्ती ठेवी किंवा आरडी आपल्याला मोठ्या प्रमाणात बचत करण्यात मदत करू शकतात. आपण ते पिगी बँक म्हणून वापरू शकता. याचा अर्थ असा की आपण दरमहा पगार आल्यावर आपण त्यात एक निश्चित रक्कम ठेवत आहात आणि जेव्हा ते परिपक्व होते तेव्हा आपल्या हातात मोठी रक्कम असेल. पोस्टाच्या आरडीमध्ये ५.८ टक्के व्याज मिळत आहे.

गुंतवणूक १०० रुपयांपासून सुरू 

या आरडी योजनेत तुम्ही दरमहा किमान १०० रुपये गुंतवणूक करू शकता. जास्तीत जास्त ठेव रकमेवर मर्यादा नाही.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक 

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक १ सप्टेंबर २०१८ रोजी सुरू करण्यात आली. आयपीपीबी १.५५ लाख टपाल कार्यालये आणि देशभरात पसरलेल्या ३ लाख टपाल कर्मचाऱ्यांमार्फत सेवा देत आहे. यामधील १.३५ लाख टपाल कार्यालये ग्रामीण भागात  आहेत. आयपीपीबी सध्या १३ भाषांमध्ये आपल्या सेवा देत आहे.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा