Advertisement

आदित्य चोप्राला ईडीचं समन्स


आदित्य चोप्राला ईडीचं समन्स
SHARES

नामांकित म्यूझिक कंपन्यांच्या कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने नुकतीच छापेमारी केली होती. आता या कंपन्यांच्या मालकांना तसेच संचालकांना ईडीने समन्स बजावण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी यशराज फिल्म्सचे अध्यक्ष आदित्य चोप्रा यांना देखील ९ तारखेला बोलावल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे. आदित्य चोप्रासोबतच सोनी आणि युनिव्हर्सलच्या मुख्यांना देखील ईडीने बोलावणी धाडली आहे.


...यांचीही झाली चौकशी

अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणी शनिवारी टी सिरीजचे भूषण कुमार आणि सारेगमचे एमडी विक्रम मेहरा यांची चौकशी केली होती. कलाकार आणि गीतकारांना दिल्या जाणाऱ्या मानधनाच्या प्रकरणी ही चौकशी करण्यात आल्याचे समजते. या प्रकरणी आतापर्यंत चौकशी करण्यात आलेल्यांनी कोणतीही हेरफेर झाला नसल्याचा दावा ईडीकडे केला आहे.


ईडीचा तपास सुरू

याप्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीने ईसीआयआर (Enforcement Case Information Report) नोंदवला असून मनी लाँड्रिंगच्या अनुषंगाने सध्या ईडीचा तपास सुरू असल्याचं समजतं. डिसेंबर २०१६ पासून ईडी या प्रकरणाची चौकशी करत असून दोन टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांची चौकशी केल्यानंतर ईडीने आपला मोर्चा म्युझिक कंपन्यांकडे वळवल्याचे समजते. 

म्युझिक कंपन्यांनी गाणीही टेलिकॉम कंपन्यांना कॉलर ट्यूनसह इतर सेवांसाठी दिली होती. त्याचबरोबर गाणी ही डिजिटल रेडिओ, अॅप्लिकेशन बेस्ड म्युझिक स्ट्रीमिंग सेवा देऊन हजारो कोटी रुपये कमावले. मात्र, याचा कोणताही परतावा हा कलाकार किंवा गीतकाराला देण्यात आला नसल्याची माहीती ईडीच्या सुत्रांनी दिली आहे.



हेही वाचा -

'टी सिरीज', 'यशराज'वर 'ईडी'चे छापे


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा