Advertisement

ई-कॉमर्स कंपन्यांना जिओमार्ट देणार टक्कर

जिओमार्टद्वारे ग्राहकांना जवळील स्टोरमधून सामान घरपोच सेवा दिली जाण्याची शक्यता आहे.

ई-कॉमर्स कंपन्यांना जिओमार्ट देणार टक्कर
SHARES

व्हॉट्सअ‍ॅप (Whats app) आता अ‍ॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipcart)  या ई-कॉमर्स कंपन्यांना रिलायन्स रिटेलचे (Reliance Retail) ई-कॉमर्स वेंचर जिओमार्टद्वारे टक्कर देणार आहे. याबाबतची माहिती फेसबुक (Facebook) आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये झालेल्या भागीदारी दरम्यान देण्यात आली.

फेसबुक जिओ (JIO) प्लॅटफॉर्ममध्ये तब्बल ४३ हजार ५७४ कोटी रुपये गुंतवणार आहे. या भागीदारीद्वारे फेसबुक जिओ प्लॅटफॉर्मद्वारे भारतात आपला विस्तार करणार आहे. कंपनीसाठी भारतात ४८० मिलियन कनेक्टेड युजर आहेत. रिलायन्स रिटेलनं जानेवारीमध्ये जिओमार्टला नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण या भागांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरूवात केली होती.

रिलायन्स आणि फेसबुकच्या या भागीदारीमुळे व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीनं जिओमार्टद्वारे (JioMART) ग्राहकांना जवळील स्टोरमधून सामान घरपोच सेवा दिली जा जाणार आहे. जिओ मार्ट प्लॅटफॉर्मकडे भारतीय ग्राहकांसाठी छोटे व्यापारी आणि किराणा स्टोर्स आहेत. मात्र व्यापक स्वरूपात याचे संचालन होणे बाकी आहे.

जियोमार्ट ग्राहकांना प्रत्येक आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी ५० हजार किराणा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं वचन देत आहे. आतापर्यंत, JioMart केवळ वेबवर उपलब्ध होते. सर्व वापरकर्त्यांसाठी अधिकृतपणे लाँच झाल्यानंतर अॅप लवकरच गुगल प्ले स्टोअर आणि Apple अॅप स्टोअरवर उपलब्ध होईल.

जिओमार्ट आणि व्हॉट्सअ‍ॅप बिझिनेस सहकार्यानं देशातील लाखो लघु आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांना शॉपिंगसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहे. थेट व्यवसायांशी ग्राहकांशी जोडणी करुन आणि त्याच व्यासपीठाचा वापर करुन ग्राहकांना त्यांच्या ऑर्डरची भरपाई करण्यास मदत करून देशाला चालना मिळू शकेल.

देशात बिगबास्केट, ग्रूफर्स ते अ‍ॅमेझॉन आणि इतर बरेच काही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. लॉकडाऊनमुळे किराणा सामान किंवा दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या मागणीत वाढ झाल्यानं झोमाटो, स्विगी, उबर यासारख्या अनेक कंपन्यांनी दरवाजावर किराणा सामान वितरीत करण्यास सुरवात केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या सहकार्यानं JioMart लाँच करणे या दोन्ही प्लॅटफॉर्मची लोकप्रियता पाहता इतर प्लॅटफॉर्मसाठी धोका निर्माण करू शकेल. जिओ आणि व्हॉट्सअ‍ॅपचे एकत्रितपणे ७५० दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा