आता येणार २० रुपयांचं नाणं

सध्या भारतीय चलनात १, २, ५ आणि १० रुपयांच्या नाण्याचा समावेश आहे. या नाण्यांच्या नवीन सिरिजचं गुरूवारी अनावरण करण्यात आलं. तसंच २० रुपयांचं नाणंही लाॅन्च करण्यात आलं. ही सर्व नाणी मुंबईसह कोलकाता, हैदराबाद आणि नोएडा येथील टांकसाळीत बनवण्यात येणार आहेत.

SHARE

सुट्या पैशांची कमतरता भरुन काढण्यासाठी भारतीय चलनात लवकरच २० रुपयांचं नाणं दाखल करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ (आरबीआय) या नाण्याची निर्मिती करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जुन्या नाण्यांच्या नवीन डिझाईनसह २० रुपयांच्या नाण्याचं गुरूवारी अनावरण केलं.


नव्या सिरिजची नाणी

सध्या भारतीय चलनात १, २, ५ आणि १० रुपयांच्या नाण्याचा समावेश आहे. या नाण्यांच्या नवीन सिरिजचं गुरूवारी अनावरण करण्यात आलं. तसंच २० रुपयांचं नाणंही लाॅन्च करण्यात आलं. ही सर्व नाणी मुंबईसह कोलकाता, हैदराबाद आणि नोएडा येथील टांकसाळीत बनवण्यात येणार आहेत. या नवीन नाण्यांसह जुनी नाणी देखील चलनात राहणार आहेत. काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ १०० रुपयांचं नाणं लॉन्च करण्यात आलं होतं.

२० रुपयांची नाणी का?

सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेत १० आणि २० रुपयांच्या ५० हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या नोटा आहेत. तर २६ हजार कोटी रुपयांची नाणी देखील चलनात आहेत. नोटा फारतर ५ वर्षांपर्यंत चांगल्या अवस्थेत राहतात. मात्र नाणी दिर्घकाळ टिकतात. त्यामुळे भारतीय चलनान अधिकाधिक नाणी आणण्याचा रिझर्व्ह बँकेचा प्रयत्न आहे. याच योजनेनुसार २० रुपयांची नाणी चलनात आणली जात आहेत.


कसं असेल नाणं?

२० रुपयांचं नाणं तीन धातूंपासून बनवण्यात येणार आहे. नाण्याच्या बाहेरच्या रिंगमध्ये ६५ टक्के तांबे, १५ टक्के जस्त आणि २० टक्के निकेल असेल. तर आतील रिंगमध्ये ७५ टक्के तांबे, २० टक्के जस्त आणि ५ टक्के निकेल असेल. या नाण्याचा आकार २७ एमएम एवढा असेल. या नाण्याचं वजन ८.५४ ग्रॅम असेल. नाण्याच्या पुढील बाजूला अशोक स्तंभाचं निशाण असेल आणि त्याखाली ‘सत्यमेव जयते’ लिहिलेलं असेल. नाण्याच्या डाव्या बाजूला ‘भारत’ आणि उजव्या बाजूला ‘INDIA’ लिहिलेलं असेल. नाण्याच्या मागे 20 रुपये असा उल्लेख असेल.हेही वाचा-

श्रीमंतांच्या जागतिक यादीत मुकेश अंबानी १० व्या स्थानावर

रेपो रेटमध्ये कपात, गृहकर्ज स्वस्त होणारसंबंधित विषय
ताज्या बातम्या