Advertisement

‘फिच’ने घटवला भारताचा ग्रोथ अंदाज


‘फिच’ने घटवला भारताचा ग्रोथ अंदाज
SHARES

जगातील ३ मोठ्या रेटींग कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘फिच’ आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने मंगळवारी भारताच्या विकासदरवाढी (जीडीपी ग्रोथ)च्या अंदाजात घट केली आहे. सोबतच विकासाच्या मुद्द्यावर भारताची वाटचाल निराशाजनक असल्याचं नमूद केलं आहे.


किती घट?

फिचच्या अंदाजानुसार चालू आर्थिक वर्षांत (२०१७-१८) मध्ये भारताची विकासदरवाढ ६.७ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर याअगोदर भारताच्या विकासदरवाढीचा अंदाज ६.९ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

फिचने २०१८-१९ आर्थिक वर्षासाठी भारताचा ग्रोथ रेट अंदाज १० बीपीएसवरून ०.१० टक्क्यांनी घटवून ७.३ टक्के केला आहे. यापूर्वी फिचने सप्टेंबरचा ग्लोबल इकाॅनाॅमिक आऊटलूट (जीईओ) मध्ये ग्रोथ रेट ७.४ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता.


फिचचं काय म्हणणं?

आपला अहवाल जाहीर करताना फिचने स्पष्ट केलं की, भारतातील स्ट्रक्चरला रिफाॅर्मचं धोरणं हळूहळू अंमलात येईल, त्याआधारे डिस्पोजल इन्कम वाढून पुढच्या २ वर्षांत जीडीपी ग्रोथ रेट वाढेल, अशी शक्यता आहे. नोटाबंदी आणि पाठोपाठ आलेल्या जीएसटीमुळे अर्थव्यवस्था मंदगतीने वाटचाल करत असल्याचं फिचचं म्हणणं आहे.

जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारताचा जीडीपी ग्रोथ रेट ६.३ टक्के होती. तर पहिल्या तिमाहीत ग्रोथ रेट ५.७ टक्के होती. जीडीपीत झालेली ही ०.५ टक्क्यांची वाढ हाच काय भारतीय अर्थव्यवस्थेसाठी थोडाफार दिलासा होता. कारण मागील सलग ५ तिमाहीत सातत्याने घसरणच होत होती.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा