Advertisement

सोने-चांदीच्या दरांत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

मागील काही दिवसांपासून आकाशाला जाऊन भिडलेले सोने-चांदीचे दर पुन्हा एकदा खाली येऊ लागले आहेत.

सोने-चांदीच्या दरांत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर
SHARES

मागील काही दिवसांपासून आकाशाला जाऊन भिडलेले सोने-चांदीचे दर पुन्हा एकदा खाली येऊ लागले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या दरांत मोठी घसरण पाहायला मिळाली. यामुळे भारतातील सराफा बाजारात देखील सोने-चांदीच्या दरांत घट झाली आहे. (gold and silver rate decrease in mumbai)

रशिया आणि चीनमध्ये कोरोना विषाणूवरील लस विकसित झाल्याने गुंतवणूकदारांनी सोने-चांदीत केलेली गुंतवणूक काढून घ्यायला सुरूवात केली आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर होऊ लागला आहे. याआधी याच गुंतणुकीमुळे सोने-चंदीचे दर कमालिचे वाढत होते.

सराफा बाजारात गुरूवारी सोन्याच्या दरात प्रतितोळा ८०० रुपयांची घसरण झाली. तर चांदीचा भाव प्रति किलो १४०० रुपयांनी खाली आला. गेल्या २ दिवसात सोने १६०० रूपये, तर चांदी जवळपास ३००० रुपयांनी खाली आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचा दर २००० डॉलरच्या खाली आला असून १९५० डॉलर प्रति औसवर स्थिरावला आहे.

एमसीएक्सवरील वायदा बाजारात २ ऑक्टोबरच्या सोन्याचा दर जवळपास ७७२.०० रुपये प्रति तोळा घसरला आहे. सकाळी बाजार सुरु होताच सोन्याचा दर ३०० रुपयांनी कमी होऊन ५२,३२० प्रति तोळ्यावर आला होता. दिल्ली सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळ्यासाठी ५२ हजार ५२८ रुपये झाला आहे. दुसरीकडे १ किलो चांदीसाठी ६६ हजार ४४८ रुपये मोजावे लागत आहेत. 

मुंबईत मात्र सोन्याच्या दरांत ९९० रुपयांची घसरण झाल्याने मुंबईत २२ कॅरेटसाठी प्रतितोळा ५१,९८० इतका दर आहे, तर २४ कॅरेटसाठी प्रति तोळा ५२,९८० इतका दर आहे. साधारणत: १० दिवसांपूर्वी हेच दर ११ आॅगस्टला २२ कॅरेटसाठी प्रतितोळा ५३,३८० इतके, तर २४ कॅरेटसाठी प्रति तोळा ५४,३८० इतके होते.


हेही वाचा-

सोन्याच्या किंमतीवर प्रभाव पाडणारे ५ घटक

सोन्याच्या दरानं गाठला उच्चांक, मुंबईत सोनं ५४ हजारांच्या पार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा