सोनं पुन्हा 30 हजार प्रतितोळा


SHARE

मुंबई - सोन्याचा भाव रविवारी पून्हा एकदा पूर्वपदावर आलाय. 1000-500 रुपयांच्या नोटा चलनातून अचानक बाद झाल्यानंतर सोन्याचे भाव गगणाला भिडले होते. 30 हजारांना प्रतितोळा मिळणारं सोनं थेट 34 हजारांपर्यंत पोहोचलं होतं. मात्र दोन दिवसांच्या घडामोडीनंतर सोन्याचे भाव पुन्हा एकदा पूर्वपदावर आलेत. 500 आणि 1000 रुपये चलनातून रद्द झाले या घबराटीतून सोन्याचे भाव अचानक वाढल्याचे जाणकारांचे म्हणणं आहे. तर दुसरीकडे आयकर विभागानं ज्वेलर्सवर टाकलेल्या धाडसत्रांमुळेही सोन्याच्या व्यापाऱ्यांनी धास्ती घेतल्याचं बोलंल जातंय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या