Advertisement

आर्थिक सुधारणेच्या आशेने सोन्याच्या किमतीत घसरण

जागतिक स्तरावर कोरोनाबाधित नव्या रुग्णांमध्ये घट दिसून आल्याने अर्थव्यवस्था रुळावर येण्याची आशा निर्माण झाली आहे. याचा परिणाम स्पॉट गोल्डवर झाल्याने सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली.

आर्थिक सुधारणेच्या आशेने सोन्याच्या किमतीत घसरण
SHARES

जागतिक स्तरावर कोरोनाबाधित नव्या रुग्णांमध्ये घट दिसून आल्याने अर्थव्यवस्था रुळावर येण्याची आशा निर्माण झाली आहे. याचा परिणाम स्पॉट गोल्डवर झाल्याने सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली, असं मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे अकृषी कमोडिटीज व चलनचे प्रमुख विश्लेषक प्रथमेश माल्ल्या यांनी व्यक्त केलं. 

पॅकेजचा परिणाम

व्हायरसवर मात करण्यासाठी अमेरिकी फेडरल रिझर्व्ह आणि इतर प्रमुख केंद्रीय बँकांनी मदतीसाठी उपाययोजना केल्याने बुलियन धातूच्या घसरणीवरही मर्यादा आल्या. यूरोझोन आणि जपानने अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रत्येकीसाठी अर्धा ट्रिलियन यूरोच्या स्टिमुलस पॅकेजची घोषणा केली आहे. येत्या काही दिवसात जगभरातील विविध सरकारांनी घोषित केलेल्या प्रोत्साहन पॅकेजच्या परिणामांमुळे सोन्याच्या किंमतीही प्रभावित होतील. असं म्हटलं जात आहे. 

इतकी घसरण

बुधवारी सोन्याच्या किंमतीत ०.१६ टक्के घट होऊन त्या १६४५.८ डॉलर प्रति औसावर बंद झाल्या. तर स्पॉट सिल्व्हरच्या किंमती ०.१३१ टक्क्यांच्या किरकोळ घसरणीसह १५.० डॉलर प्रति औस या दरावर बंद झाल्या. एमसीएक्सवर याच किंमती ०.८२ टक्क्यांच्या घसरणीसह ४३,१३९ रुपये प्रति किलोग्रामवर बंद झाल्या.

तेल उत्पादकांमध्ये स्पर्धा

येत्या काही आठवड्यांमध्ये तेलाच्या उत्पादनात कपातीवर ओपेक आणि इतर प्रमुख तेल उत्पादक देशांमध्ये सहमती होण्याच्या आशेने बुधवारी कच्च्या तेलाच्या किंमती ६.१ टक्क्यांनी वाढून२५.१ डॉलर प्रति बॅरलवर बंद झाल्या. ओपेक + च्या बैठकीनंतर क्रूड ऑइलच्या किंमतीत घसरण झाली होती. त्यामुळे पुरवठ्याच्या कपातीचा निर्णय घेण्यास विलंब झाला.  तसेच सौदी अरब आणि रशियादरम्यान बाजारातील जास्तीचा वाटा घेण्यावरून स्पर्धा सुरू झाली.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा