Advertisement

'GST'चे दर वाढणार?

केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे अधिकारी दर वाढवण्यासंदर्भात विचार करत आहेत.

'GST'चे दर वाढणार?
SHARES

गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स म्हणजेच GST  दर वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे अधिकारी दर वाढवण्यासंदर्भात विचार करत आहेत. या बैठकीत GST चे दर, GST स्लॅब आणि कॉम्पेन्सेशन सेसवर चर्चा होईल आणि त्यात बदल करण्याची शिफारस केली जाईल.


खिशाला कात्री?

GST ची वसुली कमी झाल्यामुळे यावर काय उपाय करता येतील यावर चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारनं मागच्या आठवड्यात राज्यांकडून याबद्दल सूचना मागवल्या होत्या. यानुसार GST चे दर वाढवण्यावर रणनीती ठरेल. ज्या वस्तू आता GST च्या कक्षेत येत नाहीत त्या वस्तूही GST स्लॅबमध्ये आणाव्या, अशाही सूचना आल्या आहेत.


कोणत्या गोष्टी महागणार

रॉ सिल्क, लक्झरी हेल्थकेअर, हाय व्हॅल्यूम होम लिजिंग, ब्रँडेड सिरियल्स, पिझ्झा, रेस्टॉरंट, क्रूझ शॉपिंग, प्रिंट अॅडव्हर्टायझिंग, एसी ट्रेन तिकिटं, ऑलिव्ह ऑइल अशा वस्तूंच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. यातून GST ची वसुली वाढवण्याचा सरकारचा विचार आहे.


GST स्लॅबमध्ये बदल

GST स्लॅबमध्ये बदल करण्याची चर्चा आहे. सगळ्यात कमी स्लॅब 5 टक्के आहे. तो वाढवून 6 ते 8 टक्के करण्याची शिफारस राज्यांनी केली आहे. GST च्या दरात बदल केल्यामुळे कपडे, हॉटेलिंग अशा वस्तू महागणार आहेत. GST ची अमलबजावणी योग्य रितीनं करण्यासाठी केंद्र सरकारनं राज्य सरकारांच्या सूचना मागवल्या आहेत.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा