Advertisement

पोस्टाच्या 'या' योजनांचा प्रीमियम भरण्यास मुदतवाढ

कोरोना व्हायरसमुळे देशभरात लाॅकडाऊन असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे पोस्टाच्या योजनांचा प्रीमियम भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

पोस्टाच्या 'या' योजनांचा प्रीमियम भरण्यास मुदतवाढ
SHARES

कोरोना व्हायरसमुळे देशभरात लाॅकडाऊन असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे सरकारने पोस्टल लाइफ इन्शुरन्स आणि रुरल पोस्टल लाइफ इन्शुरन्सचा प्रीमियम भरण्याची शेवटची तारीख 30 जून 2020 पर्यंत वाढवली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे 13 लाख पॉलिसीधारकांचा फायदा होणार आहे. 

पॉलिसीधारकांच्या समस्या कमी करण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. या दोन्ही योजनांच्या पॉलिसीधारकांना प्रीमियम भरण्यासाठी समस्या येत होती. अत्यावश्यक सेवांसाठी देशभरातील पोस्ट ऑफिस खुले आहेत पोस्टल लाइफ इन्शुरन्स आणि रुरल पोस्टल लाइफ इन्शुरन्सच्या पॉलिसीधारकांना 30 जून 2020 पर्यंत त्यांना मार्च, एप्रिल, मे या महिन्यांचा प्रीमियम कधीही भरता येणार आहे. तीनही महिन्यांच्या प्रीमियम जूनपर्यंत भरल्याने कोणतीही पेनल्टी अर्थांत दंड देखील बसणार नाही आहे. त्याचप्रमाणे ऑनलाइन पोस्टल सुविधांच्या माध्यमातून पॉलिसीधारक प्रीमियम भरू शकतात.

याआधी पोस्टल लाइफ इन्शुरन्स आणि रुरल पोस्टल लाइफ इन्शुरन्स भरण्याची तारीख 30 एप्रिल 2020 पर्यंत वाढवण्यात आली होती. आता सरकारच्या या निर्णयानंतर या योजनेच्या 13 लाख पॉलिसीधारकांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये 5.5 लाख पोस्टल लाइफ इन्शुरन्स पॉलिसीधारक आहेत. तर 7.5 लाख रुरल पोस्टल लाइफ इन्शुरन्सचे पॉलिसीधारक आहेत.



हेही वाचा -

१ ते १० वर्षे वयोगटातील २१ मुलांना करोनाची लागण

Coronavirus Updates: दादरमध्ये कोरोनाचे आणखी ३ नवे रुग्ण




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा