'सॅटर्डे क्लब'च्या माध्यमातून उद्योजकांना मार्गदर्शन

  मुंबई  -  

  विलेपार्ले - एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत. ही टॅग लाईन आहे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट या संस्थेची. मराठी उद्योजकांना प्राधान्याने व्यासपीठ मिळवून देणारी ही एक संस्था.18 ते 25 वर्ष वयोगटातील तरुण कसा उद्योजक बनू शकतो यासाठी ही संस्था मार्गदर्शन करते आणि याचसाठी या संस्थेने बुधवारी पार्ले इंटरनॅशनल सभागृहात चर्चासत्राचे आयोजन केले होते.

  उद्योग करण्याची इच्छा असलेल्या मराठी तरुणांना मदत करणे हा या संस्थेचा उद्देश आहे. बँक आणि उद्योजकांमधील एक दुवा म्हणून ही संस्था कार्यरत आहे.

  माधव भिडे, संस्थापक, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट

  या चर्चासत्राला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या चर्चासत्रात मेक इन इंडिया, स्किल्ड इंडिया आणि डिजिटल इंडियाचे प्रमोशन हेड जगत शहा आणि रिलायन्स फाऊंडेशनचे चीफ ऑपरेटिव्ह ऑफिसर जितेंद्र कलरा यांची प्रमुख उपस्थिती होती. विशेष म्हणजे आतापर्यंत 1100 उद्योजकांनी सॅटर्डे क्लबमध्ये नोंदणी केली आहे.

  नोकऱ्या कमी आहेत. त्यामुळे नवीन उद्योग कसा सुरू करावा? याची माहिती आम्ही देतोय. आपले ज्ञान वापरून कशा प्रकारे डिजीटल मीडियावर उद्योगाचे जाळे पसरवता येईल? याचेही मार्गदर्शन देण्यात आले. 

  - जितेंद्र कलरा, चीफ ऑपरेटिव्ह ऑफिसर, रिलायन्स फाऊंडेशन

  जास्तीत जास्त तरुण उद्योजक तयार व्हावेत, यासाठी यंगस्टर सॅटर्डे क्लबची स्थापना देखील करण्यात आली आहे.

  ज्यांची कष्ट करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी सॅटर्डे क्लब पुढे आला आहे.

  अशोक दुकाडे, ट्रस्टी

  सध्याच्या युगात एकीकडे नोकरीची कुणीच हमी देऊ शकत नाही. त्यामुळे तरुणांनो उद्योजक व्हा असा अनेकदा सल्ला दिला जातो. कदाचित त्याचीच पूर्तता सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून होऊ शकेल.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.