Advertisement

चांगल्या सिबिल स्कोअरसाठी 'ह्या' ३ बाबी आवश्यक

कंपन्या आपल्याला कर्ज देताना सिबिल स्कोअरबद्दल विचारतात. जर तुमचा स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला सहज कर्ज मिळेल.

चांगल्या सिबिल स्कोअरसाठी 'ह्या' ३ बाबी आवश्यक
SHARES

कर्ज घेण्यासाठी क्रेडिट किंवा सिबिल स्कोअर खूप महत्वाचा आहे. कंपन्या आपल्याला कर्ज देताना सिबिल स्कोअरबद्दल विचारतात. जर तुमचा स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला सहज कर्ज मिळेल. म्हणून सिबिल स्कोअर चांगला ठेवणं आवश्यक आहे. सिबिल स्कोअरवर अनेक गोष्टींचा परिणाम होतो. उशीरा बील भरणं,  अधिक क्रेडिट कार्डसाठी अर्ज, क्रेडिट लिमिट वाढवणे आदी कारणांमुळे तुमचा सिबिल स्कोर कमी होऊ शकतो. सिबिल स्कोअर चांगला ठेवण्यासाठी ३०/२५/२५ हा  फॉर्म्युला आवश्यक आहेआपल्या क्रेडिट स्कोअरवर त्याचा कसा परिणाम होतो हे जाणून घेऊया. 

उशीरा बिल भरल्यास

उशीर बिल भरल्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर मोठ्या प्रमाणावर प्रभावीत होतो. क्रेडिट कार्ड बिल किंवा कर्जाचा हप्ता उशीरा भरल्याचा क्रेडिट स्कोअरवर ३० टक्क्यांनी परिणाम होतो. त्यामुळे क्रेडिट स्कोअर योग्य ठेवण्यासाठी वेळेवर बिले आणि कर्जाचे हप्ते भरणे खूप महत्त्वाचे आहे.

लिमिट वाढवण्याचं योगदान

क्रेडिट कार्डची लिमिट वाढवल्याचा परिणामही क्रेडिट स्कोअरवर होतो. क्रेडिट कार्डची लिमिट वाढविल्यास त्याचे क्रेडिट स्कोअर निर्धारित करण्यामध्ये २५ टक्के योगदान दिले आहे. सुरुवातीला कंपन्या कमी लिमिटसह क्रेडिट कार्ड जारी करतात. नंतर आपला सिबिल स्कोअर चांगली असल्यास आपली मर्यादा वाढते.

एकापेक्षा अधिक कर्ज आणि क्रेडिट कार्ड

आपण अधिक क्रेडिट कार्ड वापरल्यास त्याचा आपल्या क्रेडिट अहवालावर विपरीत परिणाम होऊ शकतो.  जेव्हा आपण क्रेडिट कार्डसाठी अर्ज करता तेव्हा ते क्रेडिट अहवालाच्या चौकशी विभागात दिसते. तर आपल्याकडे बरेच क्रेडिट कार्ड असतील आणि अनेक ठिकाणी कर्ज घेण्यासाठी अर्ज केला असेल तर त्याचा परिणाम आपल्या क्रेडिट स्कोअरवर होतो. क्रेडिट कार्ड आणि कर्जासाठी बरेच अर्ज केले असल्यास याचा आपल्या क्रेडिट स्कोअरवर २५ टक्के परिणाम होतो. 


सिबिल स्कोअर म्हणजे काय?

क्रेडिट इन्फर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड (सीआयबीआयएल -सिबिल) ही पतमानांकन करणारी संस्था आहे. सिबिल स्कोअरसाठी बँकांकडून जमा झालेली माहिती वापरली जाते. दर तिमाहीच्या शेवटी सदस्य असणाऱ्या सर्व बँका सिबिलला आपण मंजूर केलेली कर्जे, परतफेडीची माहिती, तिमाहीत बुडीत गेलेली कर्जे, ग्राहकाचे केवायसी तपशील (म्हणजे नाव, गाव, पत्ता, पॅन क्रमांक इत्यादी ) सिबिलकडे सोपवतात. सर्व बँकाकडून आलेला हा माहितीसाठा सिबिल जमा करून घेते.
बँकेकडे कुणी ग्राहक कर्ज मागण्यासाठी आला की बँका सिबिलकडे त्या ग्राहकाची माहिती मागतात. इतर सर्व सदस्य बँकाकडून आलेल्या माहितीचा धांडोळा घेऊन सिबिल त्या ग्राहकाची आर्थिक कुंडली बनवते. या ग्राहकाने कुठल्या बँकेकडून कर्ज घेतले, किती घेतले, परतफेड कशी केली, बुडीत झाले का? इत्यादी अनेक गोष्टी, ग्राहकाचा सिबिल स्कोअर मोजताना ध्यानात घेतल्या जातात.


हेही वाचा - 

SBI चं 'हे' एटीएम १ जानेवारीपासून होणार बंद

वर्षात मुकेश अंबानींच्या संपत्तीत 'इतकी' मोठी वाढ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा