Advertisement

आयकर विभागाच्या ई-मेलकडे दुर्लक्ष करू नका, करदात्यांना आवाहन

आम्ही पाठवलेल्या कोणत्याही ई-मेलकडे दुर्लक्ष करू नका, असं आवाहन आयकर विभागाने करदात्यांना केलं आहे. आयकर विभागाने याबाबत एक ट्वीट केलं आहे.

आयकर विभागाच्या ई-मेलकडे दुर्लक्ष करू नका, करदात्यांना आवाहन
SHARES

आम्ही पाठवलेल्या कोणत्याही ई-मेलकडे दुर्लक्ष करू नका, असं आवाहन आयकर विभागाने करदात्यांना केलं आहे. आयकर विभागाने याबाबत एक ट्वीट केलं आहे. 

कोरोना संकटकाळात करदात्यांना प्रत्येक महत्त्वाचा मेसेज मिळावा यासाठी आयकर विभागाने वेळीवेळी ई-मेलद्वारे सूचना केल्या. मात्र अनेक करदाते मेले चेक करत नसल्यामुळे त्यांच्यापुढे अडचणी येत असल्याचं दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, आम्ही पाठवलेला प्रत्येक ई-मेल हे महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले असता तुम्हाला नुकसान होऊ शकतं.

आयकर विभागाने १ एप्रिल २०२० ते १७ नोव्हेंबर २०२० पर्यंत ४०.१९ लाख करदात्यांना १,३६,०६६ कोटींचा परतावा दिला आहे. यामध्ये ३८,२३,३०४ प्रकरणांमध्ये ३५,७५० कोटी रुपयांचा वैयक्तिक आयकर परतावा दिला गेला. तर १,९५,५१८ प्रकरणांमध्ये १,००,३१८ कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कर परतावाही देण्यात आला आहे.

हेही वाचा -

मध्य रेल्वे 'या' मार्गावर चालविणार ८ उपनगरी सेवा

कोरोना उपचार केंद्रातील तब्बल ६७ टक्के खाटा रिकाम्या

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा