Advertisement

लाॅकडाऊनमध्येही ऑनलाइन विमा विक्रीत वाढ

लोक आयुर्विमा आणि आरोग्य विम्याबाबत जागरूक असल्याचं दिसून येत आहे. ऑनलाइन विमा घेण्यास अनेकांनी पसंती दिली आहे.

लाॅकडाऊनमध्येही ऑनलाइन विमा विक्रीत वाढ
SHARES

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून देशभरात २१ दिवसांचा लॉक डाऊन घोषीत करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात सर्वच सेवा ठप्प झाल्या आहेत. मात्र अशा परिस्थितीतही लोक आयुर्विमा आणि आरोग्य विम्याबाबत जागरूक असल्याचं दिसून येत आहे. ऑनलाइन विमा घेण्यास अनेकांनी पसंती दिली आहे. त्यामुळे मागील काही दिवसात ऑनलाइन आरोग्य विमा आणि आयुर्विमा विक्रीत वाढ झाल्याचं पॉलिसीबझारच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे., 


पॉलिसीबझारच्या आकडेवारीनुसार, महिनाभरात ऑनलाइन विम्याची मागणी वाढली आहे. यामध्ये आरोग्य विम्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. आरोग्य विम्यामध्ये ३५ ते ४० टक्के आणि आयुर्विम्यात २० टक्के वाढ झाली आहे. डिजिटल माध्यमातून विमा विक्रीला लॉक डाऊनमुळे चालना मिळाली आहे. ग्राहकांनी थेट कंपन्यांच्या पोर्टलवरून विमा खरेदी केल्याने त्यांचीदेखील बचत झाली आहे. ऑनलाइन विमा वितरक 'डिजिट'च्या पोर्टलवर विमा विक्रीत जानेवारीच्या तुलनेत ५० टक्के वाढ झाली आहे. कंपनीच्या व्यापक आरोग्य विम्यातून आतापर्यंत ३९ लाखांचा प्रिमियम मिळाला आहे.

याशिवाय आरोग्य विम्यामधील आघाडीच्या एचडीएफसी अर्गो, रेलिगेअर, मॅक्सबुपा, एचडीएफसी लाइफ, मॅक्स लाइफ आणि टाटा एआयए लाइफ या कंपन्या डिजिटल विमा विक्री वाढवण्यासाठी पॉलिसी बझारबरोबर काम करत आहेत. काही कंपन्यांनी कोव्हीड-१९ ला विमा सुरक्षा देणाऱ्या योजना बाजारात आणल्या आहेत. कोरोना या रोगाला विमा संरक्षण देणारी विमा उत्पादने सादर करावी, अशा सूचना विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीए) विमा कंपन्यांना केली होती. गेल्याच आठवड्यात स्टार हेल्थ इन्शुरन्स या कंपनीने पुण्यात कोरोनाबाबतचा विमा दावा मंजूर केला.



हेही वाचा -

एसबीआय, बँक आॅफ इंडियाचं कर्ज स्वस्त

भीतीनं सिलिंडर बुक करण्याची गरज नाही- इंडियन ऑईल

Bombay IITकडून अॅपची निर्मिती, 'क्वॉरन्टाईन' व्यक्तींवर ठेवणार लक्ष




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा