Advertisement

आता ३० मिनिटांत घरपोच होणार सिलिंडर

आता फक्त ३० मिनिटांत तुमच्या घरी सिलिंडर पोहोचणार आहे. कारण आता यासाठी तात्काळ सेवा मिळणार आहे.

आता ३० मिनिटांत घरपोच होणार सिलिंडर
SHARES

बुकिंग केल्यानंतर सिलिंडर (LPG gas cylinder booking) घरी यायला किमान एक दिवस तरी जातो किंवा कधी कधी तर दोन-चार दिवस वाट पाहावी लागते. पण आता फक्त ३० मिनिटांत तुमच्या घरी सिलिंडर पोहोचणार आहे. कारण आता यासाठी तात्काळ सेवा मिळणार आहे.

सरकारी तेल कंपनी इंडिय ऑईल (IOC) तात्काळ LPG सेवा (Tatkal LPG Seva) सुरू करण्याची योजना आखत आहे. ज्यामार्फत फक्त अर्ध्या तासात गॅस सिलिंडर तुमच्या घरी पोहोचेल. ज्या दिवशी तुम्ही सिलिंडर बुकिंग कराल त्यानंतर ३० मिनिटांत तुमच्या घरी येईल. सुरुवातीला प्रत्येक राज्यातील एका शहरास ही सुविधा दिली जाईल.

बिझनेस स्टँडर्सच्या वृत्तानुसार, IOC प्रत्येक राज्यातील एक शहर किंवा जिल्हा निवडेल आणि तिथं ही सेवा सुरू करेल. या सेवेअंतर्गत फक्त ३० ते ४५ मिनिटांत सिलिंडर पोहोचवला जाईल. सध्या यावर काम सुरू असून लवकरच ही सुविधा उपलब्ध करून देईल असं कंपनीनं सांगितलं आहे.

१ फेब्रुवारीपासून ही सेवा सुरू करणार असल्याचं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना काही पैसे मोजावे लागतील. Tatkal LPG किंवा single day delivery service साठी चार्ज लावण्याबाबच चर्चा सुरू आहे.



हेही वाचा

बंद पडलेल्या पाॅलिसी सुरू करण्यासाठी एलआयसीकडून संधी

'एमजी हेक्टर'चं सर्वात स्वस्त २०२१ माॅडेल लाॅन्च

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा