Advertisement

बंद पडलेल्या पाॅलिसी सुरू करण्यासाठी एलआयसीकडून संधी

बंद पडलेल्या पाॅलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी आता भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) ने पाॅलिसीधारकांना एक संधी दिली आहे. एलआयसीने पॉलिसी पुनरुज्जीवनासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे.

बंद पडलेल्या पाॅलिसी सुरू करण्यासाठी एलआयसीकडून संधी
SHARES

बंद पडलेल्या पाॅलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी आता भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) ने पाॅलिसीधारकांना एक संधी दिली आहे. एलआयसीने पॉलिसी पुनरुज्जीवनासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत काही बंद पडलेल्या पाॅलिसी पुन्हा सुरू करता येणार आहेत. त्यामुळे लाखो पाॅलिसीधारकांना दिलासा मिळाला आहे. 

एलआयसीकडून ७ जानेवारी ते ६ मार्च २०२१ या कालावधीत पॉलिसी पुनरुज्जीवनासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. कोरोनामुळे संचारावर आलेले निर्बंध पाहता आणि आजही त्या संबंधी असलेले भीती व दक्षतेचे वातावरण पाहता काही अपरिहार्य कारणामुळे, विम्याचे हप्ते भरणे शक्य न झालेल्या विमाधारकांना दिलासा देण्यासाठी हे पाऊल टाकले गेल्याचं एलआयसीने स्पष्ट केले आहे.

अटी व शर्तीच्या अधीन राहून न भरलेल्या हप्त्याच्या तारखेपासून पाच वर्षे कालावधीपर्यंतच्या विशिष्ट पात्र पाॅलिसी या मोहिमेतून पुन्हा सुरू केल्या जाऊ शकतात. बहुतांश योजनांचे पुनरुज्जीवन या केवळ चांगल्या आरोग्याच्या लेखी प्रतिज्ञापन आणि कोविड प्रश्नावलीच्या आधारे केले जाईल. शिवाय, विलंब शुल्कात सवलतीचा लाभही पॉलिसीधारकांना या कालावधीत दिला जाईल.संबंधित विषय
Advertisement