Advertisement

डाॅलरच्या तुलनेत रुपयात ऐतिहासिक घसरण

दिवसअखेर रुपया ३७ पैशांनी घसरून डाॅलरच्या तुलनेत ६८.६१ वर बंद झाला. रुपया प्रति डाॅलर ६९ चा नीच्चांक गाठू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. यापूर्वी २८ आॅगस्ट २०१३ रोजी रुपयाने प्रति डाॅलर ६८.८० चा नीच्चांक नोंदवला होता.

डाॅलरच्या तुलनेत रुपयात ऐतिहासिक घसरण
SHARES

आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड आॅइलच्या चढ्या किंमतीमुळे वाढती महागाई आणि वित्तीय तुटीचा परिणाम गुरूवारी रुपयावर पडला. त्यानुसार सकाळच्या सत्रातच डाॅलरच्या तुलनेत २८ पैशांनी कमकुवत होत रुपयाने प्रति डाॅलर ६८.८९ रुपयांचा स्तर गाठला. तर दिवसअखेर रुपया ३७ पैशांनी घसरून डाॅलरच्या तुलनेत ६८.६१ वर बंद झाला. रुपया प्रति डाॅलर ६९ चा नीच्चांक गाठू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. यापूर्वी २८ आॅगस्ट २०१३ रोजी रुपयाने प्रति डाॅलर ६८.८० चा नीच्चांक नोंदवला होता.


वर्षभरात ७ टक्क्यांनी कमकुवत

गेल्या वर्षी डाॅलरच्या तुलनेत रुपयाने ५.९६ टक्क्यांची वाढ नोंदवली होती. परंतु २०१८ मध्ये रुपयाने सातत्याने डाॅलरच्या तुलनेत घट नोंदवली आहे. आतापर्यंत रुपया डाॅलरच्या तुलनेत ७ टक्क्यांनी घटला आहे.


कशाचा परिणाम?

एका बाजूला अमेरिकेने इराणकडून क्रूड आॅइल खरेदी न करण्याची सूचना खरेदीदार देशांना केली आहे, तर दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड आॅइलची कमतरता भासत आहे. क्रूड आॅइल उत्पादक देशांनी दररोज १० लाख बॅरल क्रूड आॅइलचा पुरवठा वाढवण्याचं घोषित करूनही क्रूडच्या किंमती चढ्याच आहेत. यामुळे भारतासारख्या देशाला क्रूड आॅइल आयात करण्यासाठी अधिक किंमत (डाॅलरमध्ये) मोजावी लागत आहे. परिणामी देशाची वित्तीय तूटही वाढत चालली आहे. सद्यस्थितीत क्रूड आॅइलची किंमत प्रति बॅरल ७८ डाॅलरच्या जवळपास आहे.


डाॅलरची मागणी वाढली

क्रूड आॅइल डाॅलरमध्ये विकत घेण्यात येत असल्याने जगभरातून डाॅलरची मागणी वाढते. यामुळे डाॅलर सातत्याने मजबूत होतो, म्हणजेच इतर चलनांच्या तुलनेत त्याचं मूल्य वाढतं. डाॅलरचा इंडेक्स मजबूत झाल्यावर रुपयाचं मूल्य आपसूकच कमी होतं. बाँड यील्डमधील तेजीचाही रुपयावर परिणाम होत आहे.


कुणावर परिणाम?

रुपयाच्या घसरणीचा परिणाम एडिबल आॅइल, खते आणि क्रूड आॅइलसोबतच मेटल, जेम्स अँड ज्वेलरी, आॅटो इंडस्ट्रीवर होणार आहे. कारण या वस्तू मोठ्या प्रमाणात आयात करण्यात येतात. याउलट फार्मा कंपनी आणि आयटी कंपन्यांचा फायदा होऊ शकतो, कारण या कंपन्यांना उत्पन्न डाॅलरमध्ये मिळतं.



हेही वाचा-

बँकांचे कर्ज फेडण्यास विजय माल्या तयार

दिल्लीतील एनबीसीसी वडाळ्यात बांधणार १९८० लक्झरिअस घरं



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा