Advertisement

विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना बसणार कोरोनाचा फटका

कोरोनाचा सर्वाधिक फटका जगभरातील विमान कंपन्यांना बसला आहे.

विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना बसणार कोरोनाचा फटका
SHARES

कोरोनाचा विषाणूचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. कर्मचाऱ्याचंही यामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा फैलाव होऊन नये म्हणून अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची (Work From Home ) मुभा दिली आहे. पण काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना सक्तीच्या बिनपगारी रजेवर पाठवले आहे.  याशिवाय काही कर्मचाऱ्यांचे पगार कमी करण्यात येणार आहे.

कोरोनाचा सर्वाधिक फटका जगभरातील विमान कंपन्यांना बसला आहे. विमान कंपनी इंडिगोच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपात करण्यात येणार असल्याची घोषणा सीईओ रोनोजॉय दत्ता यांनी केली आहे. दत्ता यांच्या स्वत:च्या पगारातही 25 टक्के कपात करण्यात आली आहे.कोरोनामुळे इंडिगोचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे कंपनीला कर्मचाऱ्यांचे पगार कमी करावे लागले आहेत.  एअर इंडियासुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 5 टक्क्यांची कपात करत आहे. ही कपात एअरलाइनमध्ये काम करणाऱ्या सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार आहे.

गो एअरने मंगळवारपासून आपली आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित करण्याची घोषणा केली आहे. उड्डाणांची संख्या कमी झाल्यामुळे काही कालावधीनंतर कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना पगाराच्या रजेवर पाठवेल. मात्र कंपनी कर्मचार्‍यांच्या पगारात 20 टक्के कपात करण्याचा विचार करत आहे.

जगभरातील जवळपास सर्व देशांनी पर्यटन आणि प्रवासावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे विमान कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. अनेक भारतीय एअरलाइन्सनी त्यांच्या आंतरराष्ट्रीलय उड्डाणे रद्द केली आहेत. तर डोमेस्टिक फ्लाइट्स देखील कमी केल्या आहेत.हेही वाचा -

ICICI बँक आता तुमच्या घरी

कोरोनामुळे 10 हजार कर्मचाऱ्यांना पाठवले बिनपगारी रजेवर
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा