Advertisement

नागरिकांनी काढली ‘गो कॅशलेश'ची रॅली


नागरिकांनी काढली ‘गो कॅशलेश'ची रॅली
SHARES

मुंबई - पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा 8 नोव्हेंबर 2016 रोजी पासून चलनातून बाद करण्यात आल्या असून, यापैकी केवळ 50 टक्के चलनाची पुन्हा साठवणूक कऱण्यात आली. मात्र सर्वसामान्य नागरिकांना आजही रोजच्या व्यवहारासाठी कॅशलेस चा वापर कसा करावा याबाबत योग्य ज्ञान नसल्याने त्यांची तारांबळ होत आहे. त्यामुळे 'रिमॉनिटाइज इंडिया – नागरिकांची शपथ' या कँपेनचा भाग म्हणून `गो कॅशलेस रॅली'चे आयोजन मंगळवारी मुंबईत करण्यात आले होते. या अंतर्गत डिजिटल व्यवहार करणे आणि गरजूंसाठी रोख रक्कमेची बचत करणे याबाबत जागरूक करण्यात आले.
मालाडच्या इन्फिनिटी मॉल येथून या रॅलीला सुरुवात झाली आणि मुंबईतील काळबादेवी येथे 75 बाईकस्वार विविध ठिकाणी थांबून लोकांना रोख रकमांशिवायच्या व्यवहाराबाबत जागरूक करत होते. आपल्या अर्थव्यवस्थेत रोख रकमेवर अवलंबून असलेल्यांचे प्रमाण खूप मोठे आहे आणि आपण कमीत कमी रोख रक्कम वापरली तर ती त्यांच्यापर्यंत कशी पोहचू शकेल, याबाबत जागृत करण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. याशिवाय नागरिकांना डिजिटल व्यवहाराबाबत पूर्ण माहिती देणे आणि जे रोख रकमांवर अवलंबून आहेत अशांना मदत करण्याबाबत समजावणे आदी माहिती यावेळी देण्यात आली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा