एलपीजी गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder) वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तेल कंपन्यांनी बजेटनंतर (Budget 2021) एलपीजी गॅसच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशातील सर्वात मोठी ऑइल मार्केटिंग कंपनी असणाऱ्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) नं ४ फेब्रुवारी रोजी एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ केली आहे.
इंडेननं त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती दिली आहे. या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार गॅस सबसिडी नसणाऱ्या एलपीजीची किंमत मुंबई आणि दिल्लीमध्ये २५ रुपयांनी वाढवण्यात आली आहे. दरम्यान कमर्शिअल गॅसच्या किंमतीत ६ रुपयांची घट करण्यात आली आहे.
१४.२ किलोच्या एलपीजी गॅसची किंमत ६९४ रुपये होती. या वाढीनंतर आता सबसिडी नसणाऱ्या या एलपीजी गॅसची किंमत ७१९ रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅसच्या किंमती बदलतात. पण या महिन्यात १ फेब्रुवारी रोजी बजेट असल्यानं त्या दिवशी किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नव्हता.
नवी दिल्ली - ७१९ रुपये
मुंबई - ७१९ रुपये
चेन्नई - ७३५ रुपये
कोलकाता – ७४५.५० रुपये
हेही वाचा