Advertisement

मंगळवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेल स्वस्त

राज्यात पेट्रोल २ रुपयांनी, तर डिझेल १ रुपयांनी स्वस्त झाले आहे. नवे दर मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू होतील.

मंगळवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेल स्वस्त
SHARES

केंद्र सरकारने केलेल्या विनंतीनुसार मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पेट्रोल २ रुपयांनी, तर डिझेल १ रुपयांनी स्वस्त झाले आहे. नवे दर मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू होणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

अांतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल-डिझेलचे दर कमी होऊनही त्याचा फायदा सर्वसामान्यांना मिळत नसल्यामुळे देशभरातून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली. सर्वसामान्यांचा रोष पाहून केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केली. तर प्रत्येक राज्याने व्हॅट कमी करून यासंबंधीचा अंतिम निर्णय घ्यावा अशा सूचनाही केल्या. त्यानुसार गुजरातने सर्वात आधी व्हॅट ४ टक्क्यांनी कमी करून पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले. त्यापाठोपाठ मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत पेट्रोल-डिझेलचे दर अनुक्रमे २ आणि १ रुपयांनी कमी करण्यात आले.

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील पेट्रोलवर २६ टक्के, तर डिझेलवर २४ टक्के व्हॅट आकारला जातो. त्यामुळे देशातील सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल मुंबईत विकले जाते. पेट्रोल दरकपातीमुळे सरकारला ९४० कोटी, तर डिझेल दरकपातीमुळे १ हजार ७५ कोटी असे एकूण २ हजार ६०० कोटींच्या महसूलावर पाणी सोडावे लागणार आहेे. हे आर्थिक नुकसान काटकसरीतून भरून काढू, अशी माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.


असे असतील नवे दर

मंगळवार मध्यरात्रीपासून (प्रति लीटर, रु.)

पेट्रोल
डिझेल
७५.५८
५९.५५

सध्याचे दर

७७.५८
६०.५५

 



हेही वाचा - 

'हा' आहे पेट्रोल, डिझेलचे दर ठरवण्याचा फाॅर्म्युला



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा