Advertisement

मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेतून राज्यात लाखो कोटींची गुंतवणूक

मॅग्नेटिक महाराष्ट्र कर्न्व्हजन्स २०१८ च्या माध्यमातून राज्यात १२ लाख १० हजार ४६४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे ४ हजार १०६ सामंजस्य करार झाले आहेत. या माध्यमातून ३६ लाख ७७ हजार १८५ रोजगार उपलब्ध होणार आहे.

मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेतून राज्यात लाखो कोटींची गुंतवणूक
SHARES

मॅग्नेटिक महाराष्ट्र कर्न्व्हजन्स २०१८ च्या माध्यमातून राज्यात १२ लाख १० हजार ४६४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे ४ हजार १०६ सामंजस्य करार झाले आहेत. या माध्यमातून ३६ लाख ७७ हजार १८५ रोजगार उपलब्ध होणार आहे. यामध्ये राज्याच्या अविकसित भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

यावेळी रिलायन्स उद्योग समूहाबरोबर ६० हजार कोटी गुंतवणुकीच्या तसेच भारतीय एमआयडीसी आणि रेल्वेत 600 कोटी रुपयांचा सामंजस्य करार झाला. याचदरम्यान ‘सहभाग’ या वेबपोर्टलचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं.


काय म्हणाले मुख्यमंत्री?

मॅग्नेटिक महाराष्ट्राला प्रचंड यश मिळालं आहे. राज्याच्या अविकसित भागात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक उद्योग क्षेत्रात ५ लाख ४८ हजार १६६ कोटी एवढी होणार असून गृह निर्माण क्षेत्रात ३ लाख ८५ हजार तर ऊर्जा क्षेत्रात १ लाख ६० हजार २६८ कोटी गुंतवणूक होणार आहे.

शासनाच्या विविध पायाभूत प्रकल्पांसाठी १०४ सामंजस्य करार झाले असून त्या माध्यमातून ३ लाख ९० हजार ४०९ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून २ लाख ६ हजार २६६ रोजगार निर्मिती होणार आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून संरक्षण आणि हवाई उद्योगासाठी १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.


मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन्स 2018 गुंतवणूक

 • गृह निर्माण - ७ प्रस्ताव - ३ लाख ८५ हजार कोटी
 • कृषी - ८ प्रस्ताव - १० हजार २७८ कोटी
 • पर्यटन व सांस्कृतिक - १७ प्रस्ताव - ३ हजार ७१६ कोटी
 • ऊर्जा - १७ प्रस्ताव - १ लाख ६० हजार २६८ कोटी
 • इतर - ४०८ प्रस्ताव - ९५ हजार कोटी
 • कौशल्य विकास - ११३ प्रस्ताव - १ लाख ७६७ रोजगार
 • उच्च शिक्षण - १२ प्रस्ताव - २ हजार ४३६ कोटी
 • महाआयटी - ८ प्रस्ताव - ५ हजार ७०० कोटी
 • उद्योग क्षेत्र - ३५१६ प्रस्ताव - ५ लाख ४८ हजार १६६ कोटी
 • एकूण - ४१०६ प्रस्ताव - १२ लाख १० हजार ४६४ कोटी


प्रमुख औद्योगिक प्रकल्प

 • रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड - ६० हजार कोटी
 • व्हर्जिन हायपरलूप वन - ४० हजार कोटी
 • थ्रस्ट एअरक्राफ्ट क्लस्टर (अमोल यादव) - ३५ हजार कोटी
 • जेएसडब्ल्यू इलेक्ट्रिक व्हेइकल - ६ हजार कोटी
 • ह्योसंग कंपनी - १२५० कोटी
 • महिंद्रा इलेक्ट्रिक व्हेईकल - ५०० कोटी


अविकसित भागातील महत्त्वाचे प्रकल्प

 • लॉइड मेटल अँड एनर्जी, गडचिरोली - ७०० कोटी
 • जिनस पेपर अँड बोर्ड, नंदूरबार - ७०० कोटी
 • टेक्नोकार्ट इंडस्ट्री, अमरावती - १८३ कोटी
 • इंडिया ॲग्रो अनाज लिमिटेड, नांदेड - २०९ कोटी
 • शिऊर ॲग्रो लिमिटेड, हिंगोली - १२५ कोटी


मध्यम, लघू आणि सुक्ष्म उद्योग क्षेत्रातील प्रकल्प

 • कॉयर क्लस्टर, सिंधुदुर्ग - ७.५६ कोटी
 • मेगा लेदर क्लस्टर, रायगड - ५०० कोटी
 • चित्रावारली फाऊंडेशन आर्ट अँड क्राफ्ट क्लस्टर - पालघर - १ कोटी
 • इलेक्ट्रॉनिक क्लस्टर, नागपूर - ५ कोटी
 • गोल्ड ज्वेलरी क्लस्टर, अहमदनगर


महत्त्वाचे गृहनिर्माण प्रकल्प

 • क्रेडाई महाराष्ट्र - १ लाख कोटी (पाच लाख परवडणारी घरे)
 • नारेडको - ९० हजार कोटी (३ लाख परवडणारी घरे)
 • खलिजी कमर्शियल बँक अँड भूमी राज - ५९ हजार कोटी (२ लाख परवडणारी घरे)
 • पोद्दार हाऊसिंग - २० हजार कोटी (१ लाख परवडणारी घरे)
 • कन्सेप्टच्युअल ॲडव्हायजरी सर्व्हिस - २५ हजार कोटी (१ लाख परवडणारी घरे)


वस्त्रोद्योग क्षेत्रातील महत्त्वाचे प्रकल्प

 • ह्योसंग - १२५९ कोटी
 • निर्वाण सिल्क - २९६ कोटी
 • पलक इंडस्ट्रिज, अमरावती - २५ कोटी
 • सुपर ब्ल्यू डेनिम - १२५ कोटी
 • व्हेरिटो टेक्स्टाईल अमरावती - २५ कोटी


ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाचे प्रकल्प

 • अदानी ग्रीन एनर्जी - ७ हजार कोटी
 • रिन्यू पॉवर व्हेंचर - १४ हजार कोटी
 • टाटा पॉवर - १५ हजार कोटी
 • सॉफ्ट बँक एनर्जी - २३ हजार कोटी
 • युनिव्हर्जी थिंक ग्रीन - २४ हजार कोटी


कृषी आणि विपणन क्षेत्रातील प्रकल्प

 • जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हवामान आधारित कृषी प्रकल्प - ४ हजार कोटी
 • आयसीआरआयएसएटी, हैद्राबाद, किसानमित्र - विदर्भातील अकरा जिल्ह्यात ६६ कोटी
 • रॉयल ॲग्रो फूडस् - १४०० कोटी
 • पलासा ॲग्रो - २७०० कोटी


फ्युचरिस्टिक सेगमेंट

 • व्हर्जिन हायपरलूप वन - ४० हजार कोटी
 • रिलायन्स इंडस्ट्रिज - ६० हजार कोटी
 • आयएसडब्ल्यू इलेक्ट्रिक व्हेइकल - ६ हजार कोटी
 • महिंद्रा इलेक्ट्रिक व्हेइकल - ५०० कोटी


लॉजिस्टिक मधील महत्त्वाचे प्रकल्प

 • देवीसिटी लॉजिस्टिक पार्क नागपूर - ४२४ कोटी
 • राज बिल्ड इन्फ्रा - ३ हजार कोटी
 • लॉजिस्टिक पार्क, पुणे - १०० कोटी


थेट परकीय गुंतवणुकीचे महत्त्वाचे प्रकल्प

 • कॅरियर मिडिया इंडिया प्रा. लि. - ३०० कोटी
 • एमर्सन प्रोसेस मॅनेजमेंट - ८१५ कोटी
 • आयएलजीआयएन ग्लोबल इंडिया - ७५० कोटी
 • एलजी इलेक्ट्रॉनिक्स - ३५० कोटी
 • ओव्हनस कॉर्निंग इंडिया - १०५० कोटी
 • पेरी विर्क - ७२८ कोटी


पायाभूत सुविधांमधील प्रकल्प

 • वाहतूक आणि बंदरे - ४८ प्रकल्प, ५९ हजार ३२ कोटी
 • सार्वजनिक बांधकाम - ५ प्रकल्प, १ लाख २१ हजार ५० कोटी
 • मुंबई महानगरपालिका - १८ प्रकल्प, ५४ हजार ४३३ कोटी
 • मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण - ३० प्रकल्प, १ लाख ३२ हजार ७६१ कोटी
 • नगर विकास - ३ प्रकल्प, २३ हजार १४३ कोटी


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा