महिंद्रा स्कॉर्पियो एसयूव्हीचा फेसलिफ्ट मॉडल लॉन्च


SHARE

महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीने भारतात मंगळवारी महिंद्रा स्कॉर्पियो एसयूव्हीचा फेसलिफ्ट हा नवीन मॉडल लॉन्च केला आहे. लॉन्च झाल्यानंतर सुरुवातीला या गाडीची किंमत 9.97 लाख रुपये असेल. स्कॉर्पिओचा फेसलिफ्ट हा मॉडल 7, 8 आणि 9 सीटरमध्ये उपलब्ध आहे. या गाडीला टाटा सफारी स्टॉर्मचे स्पर्धक मानले जात आहे.


फेसलिफ्ट मॉडलमध्ये नवीन काय?

  • पाच प्रकार - एस 3, एस 4, एस 5, एस 7 आणि एस 11
  • टॉप अँड मॉडल
  • 4 व्हील ड्राइव्ह सिस्टम
  • 2.2 लीटर mHawk डीझेल इंजिन
  • 140 हॉर्सपॉवर
  • 320 न्यूटन मीटरचा टॉर्क जेनरेट करणारे इंजन
  • सहाव्या जेनरेशनचे Borg Warner टर्बो चार्जर
  • 9.1 Bosch ABS


या कलरमध्ये उपलब्ध

बाजारात ही गाडी सध्या पांच रंगांमध्ये उपलब्ध आहे. प्रीमियम पर्ल व्हाइट, डायमंड व्हाइट, नपोली ब्लॅक, सिल्व्हर आणि मोल्टन रेड या रंगात ही गाडी उपलब्ध असेल. या नवीन स्कॉर्पियो गाडीत 6 इंच मोठी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट ही सिस्टम बसवण्यात आली आहे.

संबंधित विषय