चेंबूर - सायन-ट्रॉम्बे रोडवरील के स्टार मॉलमध्ये नेहमीच नागरिकांची मोठी गर्दी असते. चेंबूरमधील हा एकमेव मॉल असल्यानं तरुण-तरुणींची नेहमीच याठिकाणी वर्दळ असते. मात्र बुधवारपासून बंद झालेल्या पाचशे आणि हजारांच्या नोटांमुळे या मॉलमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. याच मॉलमध्ये सिनेमागृहही आहे. मात्र बुधवारी बोटावर मोजता येतील इतकेच ग्राहक याठिकाणी आल्याची माहिती इथले सुरक्षारक्षक भाउसाहेब पवार यांनी दिली.