Advertisement

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेलांकडून नोटाबंदीची प्रशंसा


मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेलांकडून नोटाबंदीची प्रशंसा
SHARES

नोटाबंदीविषयी आपल्याला तितकंसं माहीत नाही, पण पंतप्रधानांचा हा अत्यंत साहसी निर्णय आहे, असे जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी म्हटले आहे. एक वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळ्यापैशाविरोधात सर्जिकल स्ट्राईक करत नोटाबंदीचा निर्णय घेतला, त्याची प्रशंसा नडेला यांनी केली आहे.

सत्या नडेला हे त्यांच्या 'हिट रिफ्रेश' या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयची प्रशंसा केली.

ते म्हणतात 'मी कोणता राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञ नाही. मोदींच्या नोटाबंदीच्या या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला आणि तो त्यांनी कसा लागू केला, याविषयी मला काहीच माहीत नाही. पण डिजिटल व्यवहार करण्यासाठी जी फी लागते ती कमी करण्यासाठी मोदींनी जो प्रयोग केला, तो अत्यंत चांगला प्रयोग आहे. ही एक कमालीची योजना आहे. भारतासारख्या देशासाठी निश्चितच हे एक चांगले पाऊल आहे.

नडेला पुढे म्हणाले, डिजिटल टेक्नोलॉजीचा वापर कसा होतो, हे पाहणे खूप गरजेचे आहे. याचसोबत भारतीय अर्थव्यवस्थेला याचा कसा फायदा होतो याची उत्सुकता देखील आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा