Advertisement

महाराष्ट्रातल्या पर्यटनला चालना देण्यासाठी MTDC आणि Airbnbची भागिदारी

पर्यटनाला चालना देण्यासाठी एअरबीएनबीबरोबर (Airbnb) भागीदारी करत आहे.

महाराष्ट्रातल्या पर्यटनला चालना देण्यासाठी MTDC आणि Airbnbची भागिदारी
SHARES

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) महाराष्ट्र राज्यातील होमस्टे आणि बेड अँण्ड ब्रेकफास्ट पर्यटनाला चालना देण्यासाठी एअरबीएनबीबरोबर (Airbnb) भागीदारी करत आहे. वृत्तानुसार, होमस्टे पर्यटनाला चालना देऊन ही भागीदारी कमी-ज्ञात गंतव्यस्थानाच्या प्रवासास प्रोत्साहित करेल. राज्यात सर्वसमावेशक नेतृत्व असलेल्या पर्यटनास सक्षम करेल

करारानुसार, एमटीडीसी आणि एअरबीएनबी महाराष्ट्रातील जवळच्या प्रवासाला जाण्यासाठी उत्तेजन देईल. जे प्रवाशांना एक अनोखा अनुभव देतील. महाराष्ट्रातील तीन एमटीडीसी मालमत्तांच्या माध्यमातून प्रवाशांना फार्म स्टेज, वेबिनार आणि वर्कशॉप्ससह विविध प्रकारचे ऑफर देतील.

या भागीदारीची घोषणा करताना पर्यटन, पर्यावरण आणि हवामान बदल आणि प्रोटोकॉल मंत्री, आदित्य ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्र हे पर्यावरणीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध राज्य आहे आणि प्रवाशांना अनोखा प्रवास अनुभवता येईल. सुरक्षितता देखील महत्वाची आहे. एअरबीएनबीच्या सहाय्यानं आम्ही राज्यातील होमस्टेज आणि बी अँड ब च्या वाढीसाठी पर्यावरणशास्त्र बळकट करू.”

एअरबीएनबीचे महाव्यवस्थापक (भारत, दक्षिणपूर्व आशिया, हाँगकाँग आणि तैवान) अमनप्रीत बजाज पुढे म्हणाले, “ही भागीदारी देशांतर्गत पर्यटनाच्या दिशेनं वेगानं होणारी मागणी वाढवण्यासाठी आणि आर्थिक पुनर्प्राप्तीस पाठिंबा देण्यासाठी एक मौल्यवान संधी आहे. आम्हाला एमटीडीसीबरोबर काम केल्याचा आणि त्यांच्या व्हिजनला समर्थन देण्याचा अभिमान आहे. महाराष्ट्र सरकार आणि एमटीडीसीनं या प्रयत्नांसाठी केलेलं कौतुकास्पद प्रयत्न आम्ही पाहिले आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यास आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत.”



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा