Advertisement

फेसबुक- जिओ करार पथ्थ्यावर, मुकेश अंबानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

फेसबुक -जिओ करानंतर मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी चीनमधील अलीबाबाचे संस्थापक जॅक मा यांना मागे टाकलं आहे.

फेसबुक- जिओ करार पथ्थ्यावर, मुकेश अंबानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
SHARES

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओमध्ये फेसबुकनं 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याचा मोठा फायदा अंबानी यांना होणार आहे. फेसबुक -जिओ करानंतर मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी चीनमधील अलीबाबाचे संस्थापक जॅक मा यांना मागे टाकलं आहे.

बुधवारी फेसबुक आणि रिलायन्स जिओमध्ये करार झाला. या करारानुसार फेसबुकने जिओचे 9.9 टक्के शेअर्स विकत घेतले आहेत. 43 हजार 574 कोटी रुपयांचा हा व्यवहार आहे. या करारानंतर मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 4 अब्ज डॉलर्सची वाढ होऊन ती आता 49 अब्ज डॉलर्स एवढी झाली आहे. चीनच्या जॅक मा यांच्या संपत्तीपेक्षा मुकेश अंबानी यांची संपत्ती 3 अब्ज डॉलर्सने आता जास्त आहे.

या गुंतवणुकीमुळे मार्क झुकरबर्ग यांच्या फेसबुकला  भारतातील डिजिटल मार्केटमध्ये आपले पाय भक्कमपणे रोवता येणार आहेत. तर याचा मोठा फायदा जिओलाही होणार आहे.  फेसबुक आणि जिओमधील या करारामुळे जिओ अॅप्स प्लॅटफॉर्मचं मूल्य वाढून ४.६२ लाख कोटी रुपये होणार आहे. तर हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर फेसबुक रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक करणारी सर्वात मोठी शेअर होल्डर कंपनी ठरेल. 

फेसबुक आणि रिलायन्स जिओ यांच्या कारारानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरमध्ये बुधवारी चांगली वाढ झालेली पाहायला मिळाली. एका वेळी तर 11 टक्क्यांनी वाढ होत शेअर 1359 वर गेलेला पाहायला मिळाला. एका दिवसात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला मार्केट कॅपमध्ये 90 हजार कोटींचा फायदा झाला.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा