Advertisement

मुंबईत पेट्रोलनं पार केला ११८चा टप्पा

महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल मुंबईत नव्हे तर परभणी जिल्ह्यात विकले जात आहे.

मुंबईत पेट्रोलनं पार केला ११८चा टप्पा
SHARES

कच्च्या तेलाची किंमत प्रतिबॅरल १०० डॉलरच्या जवळ आली आहे. तरी भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याचा ट्रेंड कायम आहे. मुंबईत पेट्रोल ११८.८१ रुपये तर डिझेल १०३.०४ रुपयांना विकले जात आहे. तर, पुणे शहारत ११८.२९ रुपयांवर पोहचला आहे. तर डिझेल १०१.०१ रुपयांवर पोहोचला आहे.

दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ४०-४० पैशांची वाढ झाली आहे. यासह दिल्लीत आज पेट्रोलचा दर १०३.८१ रुपये प्रति लिटर झाला आहे. त्याचवेळी डिझेलचा दर ९५.०७ रुपये प्रति लिटर झाला आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे, महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात पेट्रोलचे सर्वाधिक दर १२०.५४ प्रति लीटर आहेत. महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल मुंबईत नव्हे तर परभणी जिल्ह्यात विकले जात आहे. यासह, पेट्रोल ११९च्या जवळ पोहोचले आहे, तर डिझेल इतर शहरांपेक्षा १०० प्रति लीटरनं अधिक महागले आहे.

पुण्यात पेट्रोलचा प्रतिलिटर दर ११७.८८ आणि डिझेलचा १००.६१ इतका आहे.

गेल्या १४ दिवसांत आज १२व्यांदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. २२ मार्चपासून दरवाढीची प्रक्रिया सुरू झाली. या दरम्यान, २४ मार्च आणि १ एप्रिल या दोनच दिवसांसाठी किमती वाढल्या नाहीत.

२२ मार्चपासून साडेचार महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर दर वाढत आहेत, जे पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर लगेचच होते. शिवाय, हे लक्षात घेण्यासारखे आहे की तज्ञांनी या वाढीचा संबंध रशिया-युक्रेन युद्धाच्या संकटाशी जोडला आहे ज्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती सात वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत.

जून २०१० पर्यंत सरकार पेट्रोलचे दर ठरवत असे आणि दर १५ दिवसांनी त्यात बदल होत असे. २६ जून २०१० नंतर सरकारनं पेट्रोलचे दर ठरवण्याचे काम तेल कंपन्यांवर सोडले. त्याचप्रमाणे ऑक्टोबर २०१४ पर्यंत डिझेलचे दरही सरकारनं निश्चित केले होते.

१९ ऑक्टोबर २०१४ पासून सरकारनं हे काम तेल कंपन्यांकडे सोपवले. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत, विनिमय दर, कर, पेट्रोल आणि डिझेलचा वाहतूक खर्च आणि इतर अनेक गोष्टी लक्षात घेऊन तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलची किंमत ठरवतात.



हेही वाचा

हॉटेलमधील जेवण महागणार, व्यवसायिक सिलिंडरच्या दरात 'इतकी' वाढ

टोपी, टी शर्टपासून परफ्यूमपर्यंत... मुंबई पोलिसांची नवी संकल्पना

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा