Advertisement

Maharashtra Budget 2022: अर्थसंकल्पात मुंबईला काय मिळालं?

महाविकास आघाडी सरकारनं सादर केलेला हा तिसरा अर्थसंकल्प होता. मुंबईकरांच्या वाट्याला काय मिळालं ते वाचा...

Maharashtra Budget 2022: अर्थसंकल्पात मुंबईला काय मिळालं?
SHARES

शुक्रवारी, ११ मार्च रोजी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री, अजित पवार यांनी मुंबईतील विधान भवनात २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. 

पवार यांनी एक तास अकरा मिनिटे अर्थसंकल्प सादर केला. एमव्हीए सरकारनं सादर केलेला हा तिसरा अर्थसंकल्प होता.

अर्थसंकल्पात मुंबईसाठी कुठल्या तरतुदी?

  • दिग्गज गायिका लता मंगेशकर यांना समर्पित संगीत विद्यालय मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये सुरू करण्यात येणार आहे. यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन २ एप्रिलला करण्यात येणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भूमिपूजन होणार आहे.
  • नवी मुंबईत महाराष्ट्र भवनाची उभारणी करण्यात येणार आहे.
  • महाराष्ट्रातील प्रत्येक महसूल विभागात एक इनोव्हेशन हब स्थापन केला जाईल ज्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • मुंबई ट्रान्समिशन अपग्रेडेशन प्रोजेक्ट जो शहराच्या मुख्य पॉवर ट्रान्समिशन नेटवर्कला अपग्रेड करतो त्यासाठी ११,५३० कोटी रुपयांच्या निधीची तरतुद
  • राज्यातील झोपडपट्टी विकास योजनेसाठी १०० कोटी रुपयांच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत, ज्याचा मुंबईसाठीही सकारात्मक परिणाम अपेक्षित आहे.
  • मुंबई ते हैदराबाद दरम्यान बुलेट ट्रेनचा प्रस्ताव मांडण्यात आला.
  • मुंबई महानगर प्रदेशाला जलमार्गाने जोडण्याचा सरकारचा विचार आहे.
  • मुंबईत पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या उभारणीसाठी 10 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

हेही वाचा

Maharashtra Budget 2022: महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं पहिलं राज्य होणार">Maharashtra Budget 2022: महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं पहिलं राज्य होणार

Maharashtra Budget 2022 : ‘एसटी’ला ३ हजार नव्या पर्यावरणपूरक बसगाड्या देणार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा