Advertisement

Maharashtra Budget 2022: महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं पहिलं राज्य होणार

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे.

Maharashtra Budget 2022: महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं पहिलं राज्य होणार
SHARES

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या नव्या तरतुदींमुळे देशभरात एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था असणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरेल, असं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.

अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचा २०२२-२३ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अजित पवारांनी विकासाच्या पंचसूत्रीवर सरकार काम करणार असल्याचं नमूद केलं.

यामध्ये कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, उद्योग या क्षेत्रांसाठी भरीव कामगिरी करून त्यांचा विकास साध्य करण्याचं धोरण राज्यानं ठेवल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं. ही पंचसूत्रीच यंदाच्या अर्थसंकल्पाचा पंचप्राण असल्याचं देखील अजित पवार यावेळी म्हणाले.

ते म्हणाले की, “राज्यात राबवण्यात येणाऱ्या विकासाची पंचसूत्री या कार्यक्रमासाठी ४ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या कार्यक्रमानंतर राज्यातली गुंतवणूक वाढेल आणि एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेलं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरेल.”

काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारनं देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याची घोषणा केली होती. या घोषणेची जोरदार चर्चा देशभर झाली होती.



हेही वाचा

Maharashtra Budget 2022 : भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटींचा निधी

Maharashtra Budget 2022 : आरोग्य सेवांवर ११ हजार कोटी खर्च करणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा