आता बिग बाझारमध्ये मिळणार नोटा

मुंबई - बँकेच्या बाहेर रांग लावून कंटाळला असाल ना. पण इथं तुम्हला दिलासा मिळू शकेल. सध्या मुंबईतल्या सर्वच बिगबाझारमध्ये डेबिट कार्ड स्वाइप केल्यानंतर नोटा मिळत आहेत. तेही कोणतीही खरेदी न करता. अनेक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला. सर्वसामान्यांचे बॅंकेच्या रांगेत उभे राहून हाल झालेत, हे पाहून बिग बझार समूहाचे अध्यक्ष किशोर बीयांनी यांनी ट्विटरद्वारे ही घोषणा केली. या पार्श्वभूमीवर शहरातल्या सर्वच बिग बझारमध्ये या घोषणेची अंमलबजावणी होताना पहायला मिळतंय. 

Loading Comments