Advertisement

एपीएमसी मार्केटमध्ये इराण, इराक, अफगाणिस्तानातून कांदा

पावसामुळे कांद्याचे ५० टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे आगामी काळात कांद्याची मोठी टंचाई भासणार आहे. हे लक्षात घेऊन अनेक व्यापाऱ्यांनी परदेशी कांदा मागवायला सुरुवात केली आहे.

एपीएमसी मार्केटमध्ये इराण, इराक, अफगाणिस्तानातून कांदा
SHARES
कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने कांद्याचे भाव १०० रुपयांच्या आसपास गेले होते. आता पुन्हा एकदा भाव कमी होण्यास सुरूवात झाली आहे. वाशी एपीएमसी मार्केटमध्ये विविध देशातील कांदा येण्यास सुरुवात झाली आहे. इराण, इराकपाठोपाठ अफगाणिस्तानचा कांदा एपीएमसीमध्ये दाखल झाला आहे. यामुळे कांद्याच्या भाववाढीला लगाम लागला असून दर ५० ते ६५ रुपयांवर आले आहेत. पावसामुळे कांद्याचे ५० टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे आगामी काळात कांद्याची मोठी टंचाई भासणार आहे. हे लक्षात घेऊन अनेक व्यापाऱ्यांनी परदेशी कांदा मागवायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी एपीएमसी मार्केटमध्ये इराणचा कांदा  दाखल झाला. त्यापाठोपाठ इराक अफगाणिस्तानचा कांदा बाजारात आला आहे. आणखी परदेशी कांदा काही व्यापाऱ्यांनी मागवला आहे. परदेशातून येणारा हा कांदा समुद्रामार्गे येत असल्याने १५ ते १८ दिवस जातात. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत आणखी परदेशी कांदा बाजारात येण्याची शक्यता आहे.

 ८० रुपये किलोपर्यंत गेलेले कांद्याचे दर आता घाऊक बाजारात ६० ते ६५ रुपये किलोवर आले आहेत. त. पुढचे दोन आठवडे तरी कांद्याचे दर वाढणार नसल्याचे चित्र बाजारात आहे. परदेशी कांदा बाजारात येत असल्याने पुन्हा कांद्याची रोजची आवक ७० ते ८० गाड्यांवर आली आहे.

हेही वाचा -

Coronavirus Updates: मुंबईत चाचण्यांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत घट

नवी मुंबईत महिन्यात रुग्ण दुपटीचा कालावधी १८६ दिवसांवर


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा