Advertisement

'या' अ‍ॅपद्वारे घरबसल्या उघडा पोस्टात खातं, जाणून घ्या प्रक्रिया

पोस्ट ऑफिसमध्ये जाण्यासाठी वेळ नसेल आणि आपल्याला तेथे रांगेत उभं राहण्याचा त्रास टाळण्याची इच्छा असेल तर आता तुम्ही घरबसल्या पोस्ट खातं उघडू शकता.

'या' अ‍ॅपद्वारे घरबसल्या उघडा पोस्टात खातं, जाणून घ्या प्रक्रिया
SHARES

जर तुम्हाला पोस्टात खातं उघडायचं असेल. मात्र पोस्ट ऑफिसमध्ये जाण्यासाठी वेळ नसेल आणि आपल्याला तेथे रांगेत उभं राहण्याचा त्रास टाळण्याची इच्छा असेल तर आता तुम्ही घरबसल्या पोस्ट खातं उघडू शकता. 

इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) आपल्या मोबाइल अॅपद्वारे पोस्ट डिजिटल खाते उघडण्याची सुविधा देत आहे. याआधी पोस्ट ऑफिस खातेदार आयपीपीबी मोबाइल अ‍ॅपद्वारे मूलभूत बँकिंग व्यवहार सहजपणे करू शकत होते. आता घरबसल्या पोस्टाचं खातंही उघडता येणार आहे.  

आयपीपीबी अ‍ॅप डाउनलोड करून पोस्टाचे डिजिटल बचत खातं तुम्ही उघडू शकता. खाते उघडण्यासाठी अर्जदाराचं वय १८ वर्षांपेक्षा अधिक असावं तसंच भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. डिजिटल बचत खाते केवळ एक वर्षासाठी वैध आहे. खाते उघडल्यानंतर एका वर्षाच्या आत तुम्हाला त्या खात्यासाठी बायोमेट्रिक्सची आवश्यकता असेल.

असं उघडा अॅपद्वारे खातं

- आपल्या मोबाइल फोनवर आयपीपीबी मोबाइल बँकिंग अ‍ॅप डाउनलोड करा. 

- आयपीपीबी मोबाइल बँकिंग अ‍ॅप उघडा आणि'ओपन अकाउंट' वर क्लिक करा.

- येथे आपणास आपला पॅन कार्ड क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक भरावा लागेल.

- पॅनकार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर भरल्यानंतर तुम्हाला लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर ओटीपी मिळेल. तो ओटीपी भरा.

- आता आपल्याला आपल्या आईचे नाव, शैक्षणिक पात्रता, पत्ता आणि नामनिर्देशित इत्यादीचा तपशील द्यावा लागेल.

- ही माहिती भरल्यानंतर सबमिटवर क्लिक करा. 

- त्यानंतर तुमचं खातं उघडलं जाईल.

अॅपद्वारे पैसे हस्तांतर

 पैसे जमा करणे, बॅलन्स चेक करणे, पैसे ट्रान्सफर करणे आणि इतर आर्थिक व्यवहारांसाठी ग्राहकांना जवळच्या पोस्ट कार्यालयात जावे लागत असे. मात्र, हे व्यवहार आयपीपीबी मोबाइल अॅपद्वारे करण्याचा सुविधा आयपीपीबीने दिली आहे. आपण आपल्या पोस्ट ऑफिस आरडी, पीपीएफ आणि सुकन्या समृध्दी खात्यात पैसे आयपीपीबी मोबाइल अॅपद्वारे हस्तांतरित करू शकता.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा