Advertisement

PAN-Aadhaar लिंकची मुदत वाढली, पण भरावा लागेल दंड

पुन्हा एकदा आधारला पॅन कार्ड लिंक करण्य़ासाठी मुदत देण्यात आली आहे.

PAN-Aadhaar लिंकची मुदत वाढली, पण भरावा लागेल दंड
SHARES

पुन्हा एकदा आधारला पॅन कार्ड लिंक करण्य़ासाठी एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्याचा कालावधील ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र आता ही सेवा मोफत नसणार आहे.

उद्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून आधारला, पॅन लिंक करण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. याबाबत केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या (CBDT)वतीने सूचना जारी करण्यात आली आहे.

नव्या सुचनेनुसार आधार, पॅन लिंकिंगला एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. आजचा दिवस आधार -पॅन लिंकिंग मोफत करण्यात येणार आहे. मात्र उद्यापासून त्यासाठी शुक्ल आकारण्यात येणार आहे.

१ एप्रिल ते ३० जून २०२२ पर्यंत आधार- पॅन लिंक केल्यास तुमच्याकडून पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात येईल. तर ३० जून नंतर आधार -पॅन लिंक केल्यास एक हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे.

सीबीडीटीनं दिलेल्या माहितीनुसार जर तुम्ही ३१ मार्च २०२२ नंतरही आधार कार्डला पॅन कार्ड लिंक केले नाही तरी तुमचे पॅन कार्ड चालूच राहणार आहेत. तुम्हाला त्या पॅन कार्डवरून बँकांशी तसंच आयकर संबंधित सर्व कामे करता येणार आहेत.

मात्र उद्यापासून आधार कार्डाला, पॅन कार्ड लिंक करण्यासाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. ३० जून २०२२ पर्यंत आधार- पॅन लिंक केल्यास तुमच्याकडून ५०० रुपयांचा दंड वसुल करण्यात येईल. तर ३० जून नंतर आधार -पॅन लिंक केल्यास १००० रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे.

इनकम टॅक्स विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार २४ जानेवरी २०२२ पर्यंत तब्बल ४३.३४ पॅन कार्डधारकांनी आपले पॅन आधारला लिंक केले आहेत. देशात आतापर्यंत १३१ कोटी लोकांना आधार कार्ड देण्यात आले आहे.

आधार कार्ड हे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट असून, आधारला पॅन लिंक केल्यास पॅन कार्डचा गैरवापर थांबवने सहज शक्य होणार असल्याचे आयकर विभागाकडून सांगण्यात आलं आहे.



हेही वाचा

मुंबईत एसी भाडेतत्वावर; महिन्याला भरा ‘इतके’ भाडे

घरगुती गॅस महागला; सर्वसामान्यांना आर्थिक फटका

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा