Advertisement

घरगुती गॅस महागला; सर्वसामान्यांना आर्थिक फटका

वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या दरांनंतर आता घरगुती गॅसच्या किंमतीतही वाढ झाली आहे. मंगळवारपासून हे नवीन दर लागू होणार आहेत.

घरगुती गॅस महागला; सर्वसामान्यांना आर्थिक फटका
SHARES

मुंबईसह राज्यभरातील नागरिकांना महागाईचा फटका बसत आहे. वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या दरांनंतर आता घरगुती गॅसच्या किंमतीतही वाढ झाली आहे. मंगळवारपासून हे नवीन दर लागू होणार आहेत. त्यामुळं महिन्याच्या आर्थिक खर्चात वाढ झाल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

घरगुती गॅस सिलेंडरही महागला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली आहे. ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर आता पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे.

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानंतर आता मुंबईत सिलेंडरची किंमत ९४९. ५० रुपये झाली आहे. मागील वर्षी ६ ऑक्टोबरला घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा सिलेंडर ५० रुपयांनी महाग झाला आहे.

शहरातील गॅसची किंमत

मुंबईसह देशातील अन्या शहरातही महागाईने उच्चांक गाठला आहे. कोलकातामध्ये ९७६ रुपये, तर चेन्नईत ९६५.५० रुपये इतका दर झाला आहे. लखनऊमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरसाठी ९८७.५० रुपये मोजावे लागणार आहे. पाटणामध्ये गॅस सिलेंडरच्या दराने १००० रुपयांचा आकडा ओलांडला आहे. पाटणामध्ये एलपीजी गॅसचा दर १०३९.५० रुपये झाला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा