Advertisement

लॉकडाऊननंतर विमान प्रवासासाठी दाखवावं लागेल मेडिकल सर्टिफेकट

लॉकडाऊन संपल्यानंतर विमानसेवा सुरू झाली तरी प्रवाशांना प्रवास करण्यासाठी मेडिकल सर्टिफिकेट दाखवावं लागण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊननंतर विमान प्रवासासाठी दाखवावं लागेल मेडिकल सर्टिफेकट
SHARES

लॉकडाऊन संपल्यानंतर विमानसेवा सुरू झाली तरी प्रवाशांना प्रवास करण्यासाठी मेडिकल सर्टिफिकेट दाखवावं लागण्याची शक्यता आहे. तसंच प्रवाशांना विमान प्रवास करायचा असेल तर त्यांना ग्लोव्ह्ज, मास्क आणि डिस्पोजेबल कॅप्ससुद्धा आपल्या बरोबर ठेवाव्या लागणार आहेत.

देशात 3 मे पर्यंत लाॅकडाऊन आहे. त्यानंतर हॉटस्पॉट परिसर वगळता इतर भागांमध्ये लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने हटवण्यात येणार आहे. मात्र रेल्वे किंवा हवाई वाहतूक पुन्हा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय केंद्राकडून घेण्यात आलेला नाही. मात्र, जेव्हा विमान प्रवास सुरू होईल तेव्हा प्रवाशांना प्रवास करण्यासाठी मेडिकल सर्टिफिकेट दाखवावं लागण्याची शक्यता आहे. याबाबत डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी, एअरपोर्ट आणि एअरलाइन्सचे अधिकारी चर्चा करत आहेत. या सर्वांची एक टेक्निकल कमिटी विमान प्रवासासाठी आखाव्या लागणाऱ्या नवीन नियमांबाबत चर्चा करत आहे. कोरोनाचे संक्रमण रोखणे हा याचा हेतू आहे. यासाठी या समितीकडून प्रवासी आणि एअरपोर्ट स्टाफसाठी मानक संचालन प्रक्रिया (SOP) तयार करण्यात येत आहे.

काही आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यासाठी मिडल सीट रिकामी ठेवण्याचा विचार करत आहेत.  कोरियन एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार त्यांचे क्रू मेंबर्स टेक ऑफपासून लँडिंगपर्यंत चश्मा, फेस मास्क आणि गाऊन घालूनच राहतील. तर ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनच्या काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी अनेक कंपन्या विमान प्रवासभाडं वाढवण्याच्या विचारात आहेत. काही फ्लाइट्समध्ये मिडल सीट देखील दिली जाण्याची शक्यता आहे. लॉकडाऊननंतर हेल्थ चेकअप, तापाची तपासणी हा सुद्धा फ्लाइट्समधील प्रक्रियेचा भाग होणार आहे. त्यामुळे मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा विमान प्रवासाआधी दाखवावं लागण्याची शक्यता आहे.


हेही वाचा -

मुंबई पोलिसांना मोठा दिलासा, ५५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांना घरीच थांबण्याचे आदेश




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा