Advertisement

दोन दिवसांनंतर पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं

मंगळवार आणि बुधवार असे सलग दोन दिवस इंधन दर स्थिर ठेवले होते. यापूर्वी सोमवारी डिझेल १६ पैशांनी स्वस्त झाले होते पेट्रोल २८ पैशांनी महागले होते.

दोन दिवसांनंतर पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं
SHARES

पेट्रोलियम कंपन्यांनी सलग दोन दिवस इंधन दर स्थिर ठेवले होते. मात्र, गुरूवारी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ केली आहे. देशभरात पेट्रोल ३५ पैसे आणि डिझेल १५ पैशांनी महागले आहे.

दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर १०१.५४ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ८९.८७ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. मुंबईत पेट्रोल १०७.५४ रुपये आणि डिझेल ९७.४५ रुपये प्रति लिटर दरानं विकण्यात येत आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल १०१.३५ रुपये आणि डिझेल ९३.९२ रुपये प्रति लिटर झालं आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.२३ रुपये आणि डिझेल ९४.३९ रुपयांवर गेलं आहे.

मंगळवार आणि बुधवार असे सलग दोन दिवस इंधन दर स्थिर ठेवले होते. यापूर्वी सोमवारी डिझेल १६ पैशांनी स्वस्त झाले होते पेट्रोल २८ पैशांनी महागले होते. रविवारी इंधन दर स्थिर ठेवले होते. तर शनिवारी पेट्रोल ३५ पैसे आणि डिझेलमध्ये २६ पैशांची वाढ झाली होती.

राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, तमिलनाडू, कर्नाटक, जम्मू आणि कश्मीर, ओडिशा, केरळ, बिहार, पंजाब, लड्डाख, सिक्किम आणि दिल्ली या ठिकाणी पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या वर गेले आहेत. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा