Advertisement

पेट्रोल, डिझेलच्या किंमती पुन्हा वाढल्या, जाणून घ्या दर

पेट्रोल आणि डिझेलचे दर मागील दोन दिवस स्थिर होते. मात्र आता पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेल महागलं आहे.

पेट्रोल, डिझेलच्या किंमती पुन्हा वाढल्या, जाणून घ्या दर
SHARES

पेट्रोल आणि डिझेलचे दर मागील दोन दिवस स्थिर होते. मात्र आता पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेल महागलं आहे. शुक्रवार पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर १७ ते १९ पैसे आणि डिझेलच्या दरात ३० पैशांची वाढ झाली आहे. 

दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल ९९.३४ रुपये प्रतिलिटर आणि डिझेल ९१.०१ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. तर दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ९३.३४ रुपये आणि डिझेलची किंमत ८३.८० रुपये झाली आहे.  

पाच राज्यांतील निवडणुकांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर होत्या. मात्र,  निवडणूक संपताच किंमती भडकल्या आहेत. देशातील बर्‍याच राज्यांमध्ये पेट्रोल १०० रुपयांच्या वर गेले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांच्या वर गेला आहे. मुंबईतील किंमतही १०० रुपयांच्या जवळ पोहोचली आहे.

देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. हे नवे दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात.

या वर्षात ३१ वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. तर ४ वेळा किंमती कमी झाल्या आहेत. जानेवारीत १० वेळा आणि फेब्रुवारीमध्ये १६ वेळा पेट्रोल, डिझेल महागलं आहे. तर मार्चमध्ये ३ वेळा आणि एप्रिलमध्ये १ वेळा किमती कमी झाल्या आहेत.



हेही वाचा -

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ 'इतक्या' दिवसांचा पाणीसाठा शिल्लक

Tauktae Cyclone: नौदलाचे शोधकार्य अद्याप सुरूच; २६ बेपत्ता, ४९ मृतदेह हाती

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा