वरळी - दादर, वरळी, प्रभादेवी, माहीम विभागांतील अनेक बँकातून पैसे काढणाऱ्या ग्राहकांना गुरुवारी 500 ऐवजी 2000 च्या नव्या नोटा मिळाल्या. पैसे मिळाले म्हणून हुश्श झालं तरी, या नोटा सुट्ट्या करण्यासाठी ग्राहकांना पुढे त्रासाचा सामना करावा लागला. आधीच दोन दिवस बँका आणि एटीएम बंद असल्यामुळे सारेच वैतागले होते. त्यात आता सुट्ट्या पैशांचा हा त्रास झाल्यामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले. प्रभादेवीत राहणाऱ्या पांडुरंग महाडिक यांना देना बँकेतून 2000ची नवी नोट मिळाली, ती सुट्टी करून घेण्यासाठी त्यांना चांगलीच कसरत करावी लागली. सरकारनं लवकरच 500 आणि हजाराच्या नोटा चलनात आणल्या तर सुट्ट्या पैशांचा त्रास थोडा तरी कमी होईल, असं मतं सर्वसामान्य मुंबईकर व्यक्त करत आहेत.