Advertisement

पीएमसी बँकेची एचडीआयएलवर कर्जाची खैरात, दिलं 'एवढं' प्रचंड कर्ज

विशेष म्हणजे पीएमसी बँकेने कर्जवाटपाची जी मर्यादा आहे त्यापेक्षा चारपट कर्ज एचडीआयएलला दिलं. बँकेच्या एकूण कर्ज वाटपापैकी फक्त एचडीआयएल या एकाच कंपनीला दिलेल्या कर्जाचं प्रमाण हे तब्बल ७३ टक्के आहे.

पीएमसी बँकेची एचडीआयएलवर कर्जाची खैरात, दिलं 'एवढं' प्रचंड कर्ज
SHARES

पंजाब  अँड  महाराष्ट्र सहकारी बँकेने (पीएमसी) बांधकाम क्षेत्रातील हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) या कंपनीला नियमबाह्यपणे कर्ज दिल्याचं उघडकीस आलं आहे. पीएमसीने या कंपनीवर अक्षरक्ष कर्जाची खैरात केल्याचं समोर आलं. आहे. दिवाळखोरीत गेलेल्या एचडीआयएलला पीएमसीने तब्बल ६५०० कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. बँकेचे माजी व्यवस्थापक संचालक जॉय थॉमस यांनी एचडीआयएलला एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज दिल्याची कबुली रिझर्व्ह बँकेसमोर दिली आहे. 

विशेष म्हणजे पीएमसी बँकेने कर्जवाटपाची जी मर्यादा आहे त्यापेक्षा चारपट कर्ज एचडीआयएलला दिलं. बँकेच्या एकूण कर्ज वाटपापैकी फक्त एचडीआयएल या एकाच कंपनीला दिलेल्या कर्जाचं प्रमाण हे तब्बल ७३ टक्के आहे. बँकेचं एकूण कर्ज वाटप ८८८० कोटी रुपये आहे. यामधील ६५०० कोटींचं कर्ज एचडीआयएला दिलं आहे. संचालक मंडळातील एका संचालकाने गुप्तपणे ताळेबंदाची खरी प्रत रिझर्व्ह बँकेकडं पोचवल्यानंतर पीएमसीचा हा बनाव उघडकीस आला. त्यानंतर थाॅमस यांना एचडीआयएला एवढं मोठं कर्ज देण्याची बँकेची चूक मान्य करावी लागली. 

थॉमस यांनी रिझर्व्ह बँकेला एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी, संचालक मंडळाच्या काही सदस्यांसह ६ लोकांनी मिळून एचडीआयएलला कर्ज देण्यास मंजुरी दिल्याचं म्हटलं आहे. संचालक मंडळातील बहुतांश सदस्यांना याची माहिती नव्हती असंही थाॅमस यांनी म्हटलं आहे. बँकेचा एकूण एनपीए ६० ते ७० टक्के असल्याची कबुलीही थाॅमस यांनी दिली आहे. 



हेही वाचा -

PMC बँकेचे ठेवीदार RBI विरोधात आझाद मैदानात करणार आंदोलन




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा