Advertisement

पुढच्या वर्षी भारतात अनुभवता येईल 5 जी स्पीड


पुढच्या वर्षी भारतात अनुभवता येईल 5 जी स्पीड
SHARES

लवकरच इंटरनेटवरून डाऊनलोड किंवा अपलोडिंग आणखी स्पीडली होणार आहे. कारण डिसेंबर 2019 पर्यंत 5 जी इंटरनेट सेवा ग्राहकांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.


मुंबईत पार पडलं 5 जीचं प्रदर्शन

गुरुवारी मुंबईत 5 जीचं प्रदर्शन झालं. त्यावेळी ही शक्यता वर्तवण्यात आली. या सेवेमुळे दैनंदिन जीवनात कसा फरक पडेल, याचं प्रेझेंटेशनही मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये करण्यात आलं. शिवाय 5 जीचा डाउनलोड स्पीड 4 जी च्या तुलनेने किमान 20 पट अधीक असावा, अशी अट ट्राय ठेवू शकते. यावेळी नोकीया, इन्टेल, सॅमसंग, जीओ आणि बीएसएनएल यां कंपन्यांनी यात उत्पादनांचं सादरीकरण केलं.


केंद्र सरकारने केली समितीची स्थापना

केंद्र सरकारने 5जी ची ही सेवा सुरू करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. यामध्ये दूरसंचार, आयटी आणि तंत्रज्ञान या तीन मंत्रालयातील सचिव यांचा समावेश आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी 500 कोटींचा आर्थिक निधी लागणार आहे.


कशी असेल ही सेवा?

शहरात १० हजार मेगाबाइट प्रति सेकंद (एमबीपीएस)
ग्रामीण भागात १ हजार मेगाबाइट प्रति सेकंद (एमबीपीएस)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा