Advertisement

दिवाळीत बँका सलग ५ दिवस राहणार बंद! उरकून घ्या आर्थिक व्यवहार

सलग सुट्ट्यांमुळे ऐन दिवाळीदरम्यान तुम्हाला रोख रकमेची चणचण भासू शकते. ७ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबरदरम्यान बँका बंद राहतील. या कालावधीत बँकांचे व्यवहार बंद असल्याने ग्राहकांना केवळ एटीएम मशीनचाच आधार असेल.

दिवाळीत बँका सलग ५ दिवस राहणार बंद! उरकून घ्या आर्थिक व्यवहार
SHARES

येत्या ६ नोव्हेंबरपर्यंत बँकेतील सर्व महत्त्वाचे व्यवहार आटोपून घ्या. कारण ७ नोव्हेंबरपासून पुढील ५ दिवस देशभरातील बँका बंद राहणार आहेत. या सलग सुट्ट्यांमुळे ऐन दिवाळीदरम्यान तुम्हाला रोख रकमेची चणचण भासू शकते. ७ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबरदरम्यान बँका बंद राहतील. या कालावधीत बँकांचे व्यवहार बंद असल्याने ग्राहकांना केवळ एटीएम मशीनचाच आधार असेल.


सुट्टी कुठली?

देशातील सर्व सरकारी आणि खासगी बँकांना ७ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन, ८ नोव्हेंबर रोजी पाडवा आणि ९ नोव्हेंबर रोजी भाऊबीजनिमित्त सुट्टी असेल. १० तारखेला दुसरा शनिवार असल्याने आणि नंतर ११ नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने बँका पुन्हा बंद राहणार आहेत.


एटीएमवर भार

बँकांना सलग ५ दिवस ही सुट्टी असल्याने एटीएमवर ताण येऊन तिथंही खडखडाट होऊ शकतो. त्यामुळे एटीएममधून देखील गरजेच्या कामांसाठी आधीच पैसे काढून ठेवावे लागणार आहेत. असं असलं तरी, बँक व्यवस्थापकांच्या मते, बँकांच्या सर्व एटीएममध्ये आवश्यक तेवढी रोकड टाकण्यात येईल. त्यामुळे दिवाळीदरम्यान रोख रकमेची टंचाई जाणवणार नाही.

त्यामुळे ग्राहकांनी महत्वाचे आर्थिक व्यवहार, पैसे काढणे किंवा बँकेत पैसे जमा करणे ही सगळी कामे दिवाळीपूर्वीच आटपून घेतलेली बरी.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा